पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल २०२१) अंतिम सामना उद्या म्हणजे २४ जूनला खेळवला जाणार आहे. करोनामुळे ही स्पर्धा मार्चमध्ये अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. मात्र आता उर्वरित हंगाम यूएईत खेळवला गेला आणि हा हंगाम आता उद्याच्या सामन्यानंतर संपणार आहे. या हंगामाचा अंतिम सामना पेशावर झल्मी आणि मुल्तान सुल्तान्सशी अबूधाबीत रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लीगशी संबधित असलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू अहमद शहझादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हायरल होण्यामागचे कारणही तितकेच आश्चर्यकारक आहे. शहझाद पाकिस्तानमध्ये लोकांच्या घरी जाऊन त्यांना दुचाकी देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका क्रीडाविषयक संकेतस्थळाने पीएसएलच्या सामन्यांदरम्यान चाहत्यांना त्यांचा अकरा जणांचा संघ निवडण्यासाठी सांगितले होते.

 

हेही वाचा – ‘‘लवकरच तू सलमान खान होशील”, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून इंग्लिश क्रिकेटरनं केलं चहलला ट्रोल

या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून दुचाकी देण्यात आली. इतकेच नव्हे, तर शहजादने या नशिबवान विजेत्यांना घरोघरी जाऊन हे बक्षीस दिले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसारखा दिसणारा क्रिकेटपटू म्हणून अहमद शहझादची ओळख आहे.

शहझादची कारकीर्द

पाकिस्तानकडून शहझादने १३ कसोटी, ८१ वनडे आणि ५९ टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २५.८१ च्या सरासरीने १४७१ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने ४०.९२च्या सरासरीने ९८२ धावा तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२.५६ च्या सरासरीने २६०५ धावा केल्या आहेत. सध्या तो पाकिस्तानच्या संघाबाहेर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star cricketer ahmed shehzad distributing two wheelers in pakistan adn
First published on: 23-06-2021 at 20:50 IST