इंग्लंडमधील सरकारचा चाहत्यांना इशारा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्समधील युरो स्पर्धा होणार असलेली स्टेडियम्स, चाहत्यांसाठीचे कक्ष आणि वाहतुक सुविधा हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते. युरो फुटबॉल चषक स्पर्धेसाठी फ्रान्समध्ये जात असाल तर कायम सावध व सतर्क रहा, असा इशारा इंग्लंड सरकारने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

युरो चषक स्पर्धेसाठी हजारो चाहते आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल होणार आहेत. मात्र गेल्या वर्षी पॅरिस शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पाश्र्वभूमीवर युरो चषक स्पर्धेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र संघ, सहयोगी, पदाधिकारी, संघटक यांच्यासह मोठय़ा प्रमाणावर जमलेले चाहते या सगळ्यांना सुरक्षा पुरवण्याचे खडतर आव्हान फ्रान्सच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर असणार आहे.

‘‘तुम्ही कायम सतर्क असायला हवे. युरो चषकाशी संलग्न प्रत्येक ठिकाण दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरू शकते. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे कसोशीने पालन करा,’’ असे फर्मान इंग्लंडने चाहत्यांसाठी काढले आहे.

युरो स्पर्धेदरम्यान हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला युक्रेनमध्ये अटक झाली. त्याच्याकडे शस्त्रात्रांचा मोठा साठा सापडला. अटकेच्या वृत्तानंतर फ्रान्समध्ये दाखल झालेल्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुरक्षितचेचा उपाय म्हणून इंग्लंड व फ्रान्सच्या सीमावर्ती भागातून जाणाऱ्या ट्रेनमध्ये दहशतवाद्यांना रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना तैनात करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay alert in france says england government
First published on: 08-06-2016 at 05:51 IST