Stuart Broad said we will chase like ODI: हेडिंग्ले येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन कसोटीत पराभूत झालेल्या इंग्लंडकडे या सामन्यात विजयाचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला विजयासाठी २२४ धावा करायच्या होत्या. आता चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. तत्पुर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठं वक्तव्य केले आहे.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मोठा दावा केला आहे. बेसबॉलचे समर्थन करताना ब्रॉडने सांगितले की, ”चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ ५० षटकांच्या सामन्याप्रमाणे हे लक्ष्य गाठेल.” इंग्लंडकडून दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मार्क वुड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सनला गोलंदाजी करायला मिळाली नाही.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
LSG vs DC IPL 2024 : आयुष बडोनीने एमएस धोनीच्या खास विक्रमाशी साधली बरोबरी, ‘या’ विशेष यादीत झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

चौथ्या दिवसाच्या खेळाला झाली सुरुवात –

तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत इंग्लंडने १४ षटकानंतर दोन बाद ६० धावा केल्या आहेत. बेन डकेट २३ आणि मोईन अली ५ धावा काढून बाद झाले आहेत. त्याचबरोबर जॅक क्रॉली ३७ चेंडूत २७ धावा काढून नाबाद आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने दोन विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडला आता विजयासाठी १९१ धावांची गरज आहे.

हेही वाचा – IND vs WI: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने जिममध्ये गाळला घाम, PHOTOS आणि VIDEO होतायेत व्हायरल

तिसऱ्या दिवसाचा खेळ –

जेव्हा हेडिंग्ले कसोटीच्या तिसर्‍या दिवशीचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद २७ धावा केल्या होत्या. बेन डकेट १८ आणि जॅक क्रॉली नऊ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी, तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या दिवसाच्या ४ बाद ११६ धावांच्या पुढे खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. परंतु त्यांचा संघ २२४ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य मिळाले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ आणि इंग्लंडने २३७ धावा केल्या होत्या. कांगारू संघाला पहिल्या डावात २६ धावांची आघाडी मिळाली होती.