गेल्या महिन्याभरापासून भारतात एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना दुसरीकडे आयपीएलच्या १७व्या हंगामात धावांचा धुरळा उडत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद यंदा ऋतुराज गायकवाडकडे आहे. मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचे किस्से आणि घटना अद्याप चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच एका प्रसंगाची २०२०च्या IPL हंगामात मोठी चर्चा पाहायला मिळाली. या चर्चेच्या केंद्रस्थानी होता सुरेश रैना!

महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सुरेश रैनानंही निवृत्ती स्वीकारली होती. पण २०२०ला दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या मध्यातूनच सुरेश रैना संघाला सोडून घरी परतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा तर सुरेश रैनावर भलत्याच कारणासाठी संघ सोडून गेल्याचा आरोपही झाला होता. मात्र, सुरेश रैनानं नुकत्याच एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.

intimate scene
आईने सहा वर्षाच्या चिमुरड्याकडून शूट करून घेतला प्रियकराबरोबरचा खासगी व्हिडीओ, नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर
Crime News
गोळ्या झाडून आईची हत्या, हातोड्याचे वार करुन पत्नीला संपवलं, मुलांना छतावरुन फेकल्यानंतर तरुणाची आत्महत्या
Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
Navi Mumbai, a case registered, young woman suicide case
नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
boy was molested, molest,
१० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
treadmill
VIDEO : बाप आहे की हैवान? फिटनेसच्या हव्यासाने घेतला पोटच्या मुलाचा जीव, ट्रेडमिल मशिनवर पळवलं अन्…

हॉटेलच्या खोलीमुळे सुरेश रैनानं IPL सोडली?

सुरेश रैनाला धोनीप्रमाणेच मोठी आणि बाल्कनी असणारी हॉटेलची रूम हवी होती, ती न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या रैनानं तेव्हा दुबईतून आयपीएल स्पर्धा सोडून माघारी परतण्याचा निर्णय घेतला, असा आरोप तेव्हा केला गेला. यावर तेव्हा मोठी चर्चाही झाली. एवढंच नव्हे तर सुरेश रैनानं संघ व्यवस्थापन आणि अगदी संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनाही या निर्णयाबाबत कळवलं नव्हतं, असाही दावा केला गेला. यावर रैनानं आता खुलासा केला आहे.

काय म्हणाला सुरेश रैना?

सुरेश रैनाला २०२०च्या आयपीएलमधून तडकाफडकी माघारी परतण्याचं कारण विचारलं असता त्यानं त्याचं कारण सांगितलं. “माझ्या कुटुंबात नातेवाईकाचं निधन झालं होतं. मी म्हटलं ठीक आहे, क्रिकेट आयुष्यभर होतच राहील, नंतर खेळता येईल. मी याबद्दल तेव्हा धोनीभाईला सांगितलं होतं. संघ व्यवस्थापनालाही मी हे कळवलं होतं. दोघांना माहिती होतं”, असं सुरेश रैना म्हणाला.

IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

“पंजाबमध्ये माझ्या कुटुंबाबाबत तेव्हा जे घडलं ते फार भयानक होतं. माझ्या काकांची हत्या करण्यात आली होती. माझा सख्खा भाऊ आणि दोन्ही चुलत भाऊ गंभीर जखमी होते. दुर्दैवाने माझ्या एका चुलत भावाचंही उपचारांदरम्यान निधन झालं. माझी आत्या अजूनही उपचार घेत आहे”, अशी पोस्टही सुरेश रैनानं एक्सवर (ट्विटर) केली होती.

२०२१च्या IPL मध्ये UNSOLD!

दरम्यान, CSK चा भाग असूनही २०२१ च्या आयपीएल लिलावात सुरेश रैना अनसोल्ड राहिला. त्यामुळे त्याला दुर्दैवाने आयपीएलमधून माघार घ्यावी लागली. मात्र, त्याचवेळी त्याचा एकेकाळचा आदर्श आणि सहकारी महेंद्रसिंह धोनी मात्र अजूनही खेळतोय, याबाबत विचारणा केली असता सुरेश रैनाने त्यावर गर्वच वाटत असल्याचं नमूद केलं. “धोनीभाई खेळतोय, चांगली गोष्ट आहे. त्यात वाईट का वाटेल? तो खेळत आहे. त्यानं अनेकदा चेन्नईला जिंकवूनही दिलं आहे. त्याचा तर गर्व वाटला पाहिजे”, असं सुरेश रैना म्हणाला.