नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे (मविप्र) घेण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय व सहाव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा मानकरी पुणे येथील सुर्यकांत पेहरे ठरला. असून त्याला १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
पेहेरेने ४२ किमी अंतर २ तास ३२ मि. २ सेकंदात गाठले आणि पहिल्या मविप्र मॅरेथॉन चषकावर आपले नाव कोरले. पारितोषिक वितरण कार्यक्रमात भारताचा कसोटीवीर व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या हस्ते सुर्यकांत पेहेरे आणि इतर उपविजेत्यांचा सन्मान करण्यात आला.