भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतला. कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात भारताला अतिशय मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. ३६ धावांवर संपूर्ण संघ गारद झाल्यानंतर टीम इंडियावर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर उर्वरित मालिकेत भारतीय संघाने जे करून दाखवलं, ते खरंच स्वप्नवत होतं. भारताने धडाकेबाज कामगिरी करत ४ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. सुमारे १० खेळाडू दुखापतीमुळे ग्रासले होते, तरीही भारताने नव्या दमाच्या खेळाडूंना साथीला घेत अनुभवी ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारली. या विजयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर नक्की डोक्यात काय विचार होता? या प्रश्नाचं अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने उत्तर दिलं.

IPL 2021 : ‘हा’ ठरेल यंदाचा सर्वात महागडा खेळाडू!

“पहिलीच कसोटी अशाप्रकारे हारणं खूपच विचित्र होतं. तो पराभव पचवणं खूपच कठीण झालं होतं. त्या पराभवातून बाहेर येऊन नव्याने उभारी घेणं कसं शक्य आहे असाच आमचा विचार सुरू होता. कारण ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूद्ध आणि विशेषत: इतक्या अनुभवी गोलंदाजांच्या ताफ्याला नव्याने सामोरं कसं जायचं ही आमची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर झालेल्या संघाच्या बैठकीच आम्ही एक नवा विचार शोधून काढला. आतापासून आपण ही कसोटी मालिका केवळ ३ सामन्यांचीच आहे असा विचार करूया असा बैठकीत सूर दिसला आणि त्याचाच आम्हाला फायदा झाला”, असं जाडेजा स्पोर्ट्सतकशी बोलताना म्हणाला.

IPL 2021: स्टीव्ह स्मिथला विकत घेण्यासाठी ‘या’ तीन संघांमध्ये असेल चुरस

“पहिल्या पराभवाबाबत कसलाही विचार करायचा नाही. केवळ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळतोय असा विचार डोक्यात ठेवायचा असं आम्ही साऱ्यांनी ठरवलं. त्यामुळे आधी काय घडलं याकडे आमचं लक्षच गेलं नाही. आमच्यासाठी केवळ तीन सामने महत्त्वाचे होते. त्या सामन्यांमध्ये आम्ही पूर्ण शक्तीनिशी उतरलो आणि दमदार कामगिरी करत विजय संपादन केला”, असं जाडेजाने स्पष्ट केलं.