टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५  असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.

 

 

हेही वाचा – सिंधूकडून शिकण्यासारखं: करोना काळाचा सिंधूनं उपयोग केला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी

हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूविरुद्धच्या दुसऱ्या गेममध्ये बिंग जिआओनेही पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सिंधूने मात्र कमी चुका करून आघाडी कायम राखली आणि जिआओने पुन्हा ११-११अशी बरोबरी साधली पण विश्वविजेत्या सिंधूने १६-१३ अशी आघाडी वाढवली.

सुवर्णपदकाचे स्वप्न हुकले

बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी २६ वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती. मात्र चायनीज तैपईच्या २७ वर्षीय ताय झू-यिंगने सिंधूवर २१-१८, २१-१२ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. ही लढत तिने ४० मिनिटांत जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics 2020 indian shuttler pv sindhu wins bronze medal adn
First published on: 01-08-2021 at 17:54 IST