टोक्यो ऑलिम्किमधून भारतासाठी खूशखबर आली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे. दीपिका कुमारीने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दिपिकाने हा सामना ६-५ ने जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दिपिका कुमारीला आज उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागणार आहे. दिपिका कुमारीसोबत अतून दासनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

सकाळी ११.३० वाजता दिपिका उपांत्यपूर्व सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. तिरंदाजी हा कोरियाचा आवडता खेळ मानला जातो. यामुळे दिपिकासाठी पुढचा मार्ग खडतर असणार आहे. पण भारतासाठी दिपिका हा खडतर मार्ग पार करत पदक जिंकेल अशी आशा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics deepika kumari reach archery quarter finals after beating roc perova in thriller sgy
First published on: 30-07-2021 at 07:29 IST