टोक्यो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आलाय. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> Tokyo Olympics 2020 Women’s Hockey: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार भारत विरुद्ध अर्जेंटिना सामना?

पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र हे उत्तम १२ खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे. तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत. मात्र असं असलं तरी नीरजला या सर्वाची चिंता करण्याची गरज नाही. कारण नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> “सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला हा तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानी होता. विशेष म्हणजे नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाचप्रकारे अंतिम फेरीमध्ये गेलाय.

ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मंगळवारी भारताच्या अन्नू राणीला पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा चमू पाठवला असून त्यात १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपलं पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयासहीत निश्चित केलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics javelin thrower neeraj chopra qualifies for mens final in first attempt scsg
First published on: 04-08-2021 at 07:34 IST