फिलीप ह्य़ुजेसच्या दुर्दैवी निधनानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना मोठा धक्का बसला आहे. त्यातून सावरणे कठीण आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी खेळण्याची त्यांची मानसिक तयारी आहे का, याविषयी आताच बोलणे उचित नाही. या मालिकेत खेळायचे की नाही हा निर्णय खेळाडूंचा असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. वेगवान गोलंदाज रायन हॅरिसने आपल्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली आहे.
पहिल्या कसोटीला काही दिवस बाकी आहेत. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कोणते खेळाडू मानसिकदृष्टय़ा सक्षम आहेत याविषयी त्या वेळीच निर्णय घेण्यात येईल. सहभागाचा निर्णय सर्वस्वी खेळाडूंचा असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2014 रोजी प्रकाशित
‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्या मानसिकतेविषयी बोलणे घाईचे’
फिलीप ह्य़ुजेसच्या दुर्दैवी निधनानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना मोठा धक्का बसला आहे. त्यातून सावरणे कठीण आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
First published on: 03-12-2014 at 12:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Too early to talk about australian cricketers mental readiness