वन डे क्रिकेट म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट सामने कंटाळवाणे होत आहेत ही बाब मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेच मान्य केली आहे. १७ मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना झाला. या दोन्ही देशांमध्ये तीन सामने होणार आहेत ज्यातला पहिला पार पडला आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

काय म्हटलं आहे सचिन तेंडुलकरने?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रस कमी झाला आहे यात काही शंका नाही. सध्या प्रत्येक संघाच्या डावात नवीन चेंडूंचा नियम आहे. जेव्हा तुमच्याकडे ५० षटकांमध्ये दोन नवीन चेंडू असतात, अशा वेळी तुम्हाला रिव्हर्स स्विंगची कला पाहायला मिळत नाही. डावातील ४० वं षटक चालू असताना, प्रत्येक चेंडूसाठी हे फक्त २० वे षटक असते आणि चेंडू फक्त ३० षटकांच्या सुमारास रिव्हर्स स्विंग होतो. त्यामुळे मला वाटते की दोन नवीन चेंडूंमुळे रिव्हर्स स्विंग ही महत्त्वाची गोष्ट एकदिवसीय क्रिकेटमधून गायब होत आहे आणि गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून ही बाब चुकीची आहे असंही सचिनने म्हटलं आहे.

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली

सचिनने म्हटलं आहे की मी एखादा मेडिकल एक्स्पर्ट नाही. मात्र बॉलवर लाळेचा वापर करणं पुन्हा सुरू केलं गेलं पाहिजे. मागच्या १०० वर्षांपासून हे घडतं आहे. २०२० मध्ये चांगला निर्णय घेतला गेला होता. मात्र आता बॉलवर लाळ लावण्याचा वापर सुरू केला गेला पाहिजे असं मत सचिनने मांडलं आहे. ICC ने करोना काळात चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली होती. मात्र आता हे सुरू केलं पाहिजे असं मत सचिनने मांडलं आहे.

वन डे क्रिकेट T20 मुळे बोअरींग झालं आहे असं मला वाटत नाही. मात्र वन डे क्रिकेटमध्ये आता पूर्वी होत असलेल्या या गोष्टी पुन्हा सुरू केल्या गेल्या तर लोकांना त्यामध्ये रस वाटेल असं सचिनने म्हटलं आहे.

बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणार का?

सचिन बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळणार का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर त्याने ठोस उत्तर न देता विषय टाळला होता. मी वेगवान गोलंदाजी करू शकत नाही. एक वेळ असा होता ज्यावेळेस सौरव गांगुलीने विकेट काढले होते, त्यावेळेस तो १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर त्याला कमरेचा त्रास जाणवला. त्यामुळे मी १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करून शकत नाही, असे उत्तर देत सचिनने या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं.