दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांचे आगमन

कडक सुरक्षा व्यवस्थेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे येथे आगमन झाले. या दोन्ही देशांतील दुसऱ्या कसोटी सामन्याला २ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या आठवडय़ात येथे दोन बॉम्बस्फोट झाले होते. या पाश्र्वभूमीवर येथे सामना खेळवणार की नाही, ही साशंकता निर्माण झाली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने खेळण्यास तयारी दर्शवल्याने सामना पूर्वनियोजित स्थळावर खेळण्याचा निर्णय ठाम ठेवण्यात आला.

कडक सुरक्षा व्यवस्थेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे येथे आगमन झाले. या दोन्ही देशांतील दुसऱ्या कसोटी सामन्याला २ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
गेल्या आठवडय़ात येथे दोन बॉम्बस्फोट झाले होते. या पाश्र्वभूमीवर येथे सामना खेळवणार की नाही, ही साशंकता निर्माण झाली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने खेळण्यास तयारी दर्शवल्याने सामना पूर्वनियोजित स्थळावर खेळण्याचा निर्णय ठाम ठेवण्यात आला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्टेडियमची या आठवडय़ात पाहणी केली असून गुरुवारपासून दोन्ही संघ सराव करणार आहेत.
हेन्रिक्सला दंड
हैदराबाद : आयसीसीच्या गणवेश आणि साहित्या संदर्भातील नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोझेस हेन्रिक्सला सामन्याच्या मानधनापैकी १० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. हॅल्मेटवर उत्पादक कंपनीचे बोधचिन्ह (लोगो) वापरल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्याकडे हेन्रिक्सन आपल्या चुकीची कबुली दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two teams came for second test match

ताज्या बातम्या