सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी का, ही चर्चा गेले काही महिने सर्वत्र खमंगपणे केली जाते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी या चर्चेत भाग घेण्याचे प्रकर्षांने टाळले. सचिन हा भारताचा महान फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण श्रीनिवासन यांनी दिले आहे.
सध्या वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन फलंदाज चांगली कामगिरी होत नसल्यामुळे संघाबाहेर आहेत. परंतु सचिनला या दोघांपेक्षा विशेष वागणूक दिली जाते का, या प्रश्नाला उत्तर देताना श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘सचिन हा भारतातील सर्वात महान क्रिकेटपटू आहे. त्यामुळे प्रत्येक मालिकेनंतर बसून सचिनच्या कामगिरीचा आढावा घेणे, हुशारीचे ठरणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सचिन इतरांहून वेगळा आहे. पण हे माझे वैयक्तिक मत आहे. संघाची निवड आणि माझे मत यात अंतर आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा करणे योग्य ठरणार नाही -श्रीनिवासन
सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करावी का, ही चर्चा गेले काही महिने सर्वत्र खमंगपणे केली जाते. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी या चर्चेत भाग घेण्याचे प्रकर्षांने टाळले.

First published on: 26-03-2013 at 02:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfair to discuss sachins retirement srinivasan