Vaibhav Suryavanshi Shot Video Viral Emerging Asia Cup: इमर्जिंग आशिया चषक २०२५ मध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ १३६ धावांवर सर्वबाद झाला. वैभवने युएईविरूद्ध पहिल्या सामन्यात १४४ धावांची वादळी खेळी केली होती, पण या सामन्यातही वैभव सूर्यवंशीने ४५ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एक उत्कृष्ट चौकार लगावला.

वैभव सूर्यवंशीने पाकिस्तान अ संघाविरूद्ध सामन्यात आपल्या शानदार फॉर्मात कायम होता. यादरम्यान त्याने २८ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. अवघ्या ५ धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांनी लागोपाठ विकेट्स गमावल्या आणि परिणामी संघाने इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या उभारली.

४५ धावांच्या खेळीत वैभव सूर्यवंशीने गुड्यावर बसत कमालीचा कव्हर ड्राईव्ह खेळत चौकार लगावला. वैभवच्या या कमालीच्या कव्हर ड्राईव्हचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. वैभव सूर्यवंशीच्या गगनचुंबी षटकारांप्रमाणे त्याच्या या कमालीच्या कव्हर ड्राईव्हने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव सूर्यवंशी पाकिस्तान शाहीन्स संघाविरूद्ध मोठी खेळी करू शकला नाही. पण त्याे ४५ धावांच्या खेळीत पाकिस्तान शाहीन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत धावा केल्या.

वैभव सूर्यवंशी चांगलया फॉर्मात असून कमालीचे फटके खेळत संघाच्या धावांमध्ये भर घालत होता. पण दहाव्या षटकात वैभवला सुफियान मुकीमने बाद केलं. त्या षटकात वैभवने एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. चौथ्या चेंडूवर, त्याने पुन्हा लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटक खेळण्याचा प्रयत्न केला. जवळपास चेंडू षटकारासाठी गेलाच होता, पण सीमारेषेजवळ असलेल्या मोहम्मद फैकने उत्कृष्ट झेल टिपत त्याला झेलबाद केलं.

वैभव सूर्यवंशीच्या युएईविरूद्धच्या १४४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला होता. इमर्जिंग आशिया चषक २०२५ मधील ही सर्वात मोठी खेळी आहे.