scorecardresearch

Premium

ला लिगा फुटबॉल : व्हॅलेन्सिआचा रिअल माद्रिदला धक्का

बलाढय़ रिअल माद्रिद संघाची सलग २२ विजयांची मालिका व्हॅलेन्सिया क्लबने येथे खंडित केली. स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत त्यांनी हा सामना २-१ असा जिंकला.

ला लिगा फुटबॉल : व्हॅलेन्सिआचा रिअल माद्रिदला धक्का

बलाढय़ रिअल माद्रिद संघाची सलग २२ विजयांची मालिका व्हॅलेन्सिया क्लबने येथे खंडित केली. स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील लढतीत त्यांनी हा सामना २-१ असा जिंकला. क्रिस्तियानो रोनाल्डो याने पेनल्टी किकद्वारे केलेल्या गोलच्या आधारे माद्रिद संघाने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात अन्तानिओ बाराग्न व निकोलस ओटामेन्डी यांनी प्रत्येकी एक गोल करीत व्हॅलेन्सियास सनसनाटी विजय मिळवून दिला.  बार्सिलोना संघास रिअल सोसीदाद संघाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता आला नाही. त्यांच्या जोर्डी अल्बा याने केलेल्या स्वयंगोलमुळेच त्यांना हा सामना ०-१ असा गमवावा लागला.  माद्रिद व बार्सिलोना या बलाढय़ संघांना एकाच दिवशी घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी ३० एप्रिल २०११ या दिवशी या संघांना पराभव पत्करावा लागला होता.
मँचेस्टर युनायटेडची आगेकूच
एफए चषक स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने येवव्हिल टाऊन संघावर २-० असा विजय मिळवला. आंदेर हेरेराने ६४व्या मिनिटाला युनायटेडचे खाते उघडले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या अँजेल डि मारियाने सुरेख गोल करत युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य लढतीत चेल्सीने व्ॉटफोर्डचा ३-० असा धुव्वा उडवला. व्हिलिअन, लोइक रेमी आणि कुर्ट झोऊमा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

India's milestone of 100 medals complete in 19th Asian Games 2023
Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव
Asian Games 2023: Indian hockey team gave a crushing defeat to Singapore registered a spectacular victory of 16-1
Asian Games, Hockey: चक दे इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा दबदबा कायम, एक-दोन नव्हे पुन्हा १६ गोल करत सिंगापूरचा उडवला धुव्वा
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Valencia shock real madrid

First published on: 06-01-2015 at 12:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×