Jonny Bairstow and Marnus Labuschagne Video Viral: लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टोच्या विकेटवरून बराच वाद झाला होता. सामना संपल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी यावर वक्तव्ये केली. त्यानंतर दोन्ही देशांच्या माजी क्रिकेटपटूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला. यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. मात्र आता एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे इंग्लंडच्या समर्थकांचे बोलती बंद झाली आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी बेअरस्टोच्या विकेटची बरीच चर्चा आहे. यावरून क्रिकेट विश्व दोन भागात विभागले गेले आहे. सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करताना बेअरस्टो चेंडू सोडल्यानंतर सहकारी फलंदाज स्टोक्सशी बोलण्यासाठी क्रीजच्या बाहेर गेला. त्याचवेळी यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने त्याला स्टंप आऊट केले. नियमानुसार चेंडू डेड नव्हता आणि बेअरस्टोला आऊट देण्यात आले.

fruad in mumbai
“दाऊद इब्राहिम माझा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!
MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…

मात्र, बेअरस्टोने याच सामन्यात मार्नस लाबुशेनला ज्या पद्धतीने बाद करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने तो स्वत: आऊट झाला. हे फार कमी लोकांना माहीत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते बेअरस्टोला खिलाडूवृत्तीची आठवण करून देत आहेत.

बेअरस्टो अगोदर क्रीजमध्ये होता आणि नंतर तो आऊट झाला –

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान, बेअरस्टोच्या आऊट होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बेन स्टोक्स म्हणाला की, पंचांनी षटक पूर्ण झाल्याची घोषणा केव्हापासून केली होती. मैदानावरील पंचांनी एक हालचाल केली, ती निर्णायक ओव्हर होती का? मला माहित नाही. जॉनी त्याच्या क्रीजमध्ये होता आणि नंतर बाहेर आला. त्याला आऊट घोषित केल्यानंतर यावर मी वाद घालू इच्छित नाही.

हेही वाचा – ENG vs AUS: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळ भावनेवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जॉनी बेअरस्टोची विकेट…”

जॉनी बेअरस्टोचे काय आहे प्रकरण?

खरं तर, इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा शॉर्ट बॉल मागे सोडला होता. यानंतर, बेअरस्टो लगेच क्रीझच्या बाहेर गेला, जेव्हा चेंडू डेड झाला झाला नव्हता आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने तो आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला आणि स्टंपच्या दिशेने परत फेकला, ज्यामुळे बेल्स विखुरल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाने आऊटची अपील केली. यानंतर थर्ड अंपायरने जॉनीला आऊट घोषित केले.