भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या, तर भारताने ३३६ धावा केल्या. या मालिकेत भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक सामन्यानंतर कोणी ना कोणाी खेळाडू दुखापतग्रस्त झाला. चौथ्या कसोटीत तर सामना सुरू असताना वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापग्रस्त झाला. त्यामुळे त्याचं उरलेलं षटक रोहित शर्माने पूर्ण केलं. रोहितची गोलंदाजी पाहून अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने मजेशीर ट्विट केलं.

नवदीप सैनी स्वत:चे ८वे षटक टाकत होता. षटकाचा अखेरचा चेंडू टाकताना नवदीप सैनीच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याने गोलंदाजी थांबवली आणि आणि तो थेट मैदानाबाहेर गेला. मग त्याच्या जागी षटकाचा उरलेला एक चेंडू रोहित शर्माने टाकला. त्या एका चेंडूच्या गोलंदाजीत त्याने १ धाव दिली. त्यानंतर दिनेश कार्तिकने रोहित शर्माबद्दल मजेशीर ट्विट केलं. “जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी, जपून राहा. आणखी एक वेगवान गोलंदाज भारताच्या ताफ्यात दाखल झालाय”, असं त्यानं ट्विट केलं. त्याचसोबत त्याने रोहित शर्माला टॅग केलं आणि अतिशय वेगवान असा हॅशटॅगही वापरला.

रोहितची गोलंदाजी-

दिनेश कार्तिकचं ट्विट-

आणखी वाचा- विराटच्या ट्विटर बायोमध्ये बदल; ‘भारतीय क्रिकेटपटू’ शब्द गायब

दरम्यान, रोहित शर्मा गेल्या काही वर्षात जास्त गोलंदाजी करताना दिसला नाही. त्याने २०१९मध्ये गोलंदाजी केली होती. पण त्यानंतर त्याने पुन्हा गोलंदाजी केली नव्हती. थेट २०२१ मध्ये केवळ १ चेंडूची गोलंदाजी त्याने केली. कसोटी कारकिर्दीत रोहितच्या नावावर २ बळींची नोंद आहे.