सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला शेवटचा कसोटी सामना खेळतो आहे. महिन्याभरापेक्षाही मोठ्या असलेल्या या दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असणार आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे. भारतीय संघ सध्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. त्याचे कारण विराट कोहलीची पालकत्व रजा… विराटची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देईल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असल्याने विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला. त्यानंतर पुढील दोन कसोटींमध्ये भारतीय संघाने त्याच्या अनुपस्थितीत उत्तम कामगिरी केली. त्यानंतर अचानक विराटने आपल्या ट्विटरच्या बायोमधून भारतीय क्रिकेटपटू शब्द हटवल्याचा प्रकार घडला आहे.

विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने गेल्या सोमवारी मुलीला जन्म दिला. विराटने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ‘कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा आशयाचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर नुकताच त्याने आपल्या ट्विटरवरील बायो म्हणजेच आपल्या बद्दल देण्यात येणारी माहिती बदलल्याची गोष्ट घडली.

विराटचा आधीचा बायो-

त्याच्या आधीच्या बायोमध्ये ‘विराट कोहलीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, भारतीय क्रिकेटपटू, खेळाडू, कारचा चाहता, फुटबॉल आवडणारा आणि सदैव उत्साही’ असा उल्लेख होता. हे सारं विराटने आता त्याच्या बायोमधून काढून टाकलं. त्याच्या जागी विराटने नवा बायो लिहिला. त्या बायोचा थेट अनुष्का आणि त्यांच्या मुलीशी संबंध आहे. विराटने नव्या बायोमध्ये लिहिले, ‘अभिमान वाटावा असा पती आणि वडिल’!

विराटचा बदललेला बायो-

आणखी वाचा- IND vs AUS: रोहितची गोलंदाजी पाहून दिनेश कार्तिकचं मजेशीर ट्विट

दरम्यान, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला की इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतून विराट संघात पुनरागमन करेल अशी माहिती देण्यात आली आहे.