पायाला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज एल. बालाजी इंग्लंडविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याच्याऐवजी आर. विनय कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे.
‘‘बालाजीच्या उजव्या टाचेला दुखापत झाली असून, तो इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ‘‘राष्ट्रीय निवड समितीने त्याच्या जागी विनय कुमारला संघात स्थान दिले आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.
बालाजीने चालू रणजी हंगामात चांगली कामगिरी बजावली आहे. तामिळनाडूसाठी खेळणाऱ्या बालाजीने चार सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. बालाजीही चांगला फॉर्मात आहे. कर्नाटकसाठी रणजी खेळणाऱ्या बालाजीच्या खात्यावर चार सामन्यांत १७ बळी जमा आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात पुणे आणि मुंबई येथे अनुक्रमे २० ते २२ डिसेंबर या दिवशी दोन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत.