Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) वजन अवघे काही ग्रॅम जास्त ठरल्याने ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. तिचा आजचा सामना सुवर्णपदकासाठी होणार होता. मात्र आता तिचं वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने ती अपात्र ठरली आहे. यामुळे भारताला कुस्तीत सुवर्णपदक मिळण्याची संधी संपल्यात जमा आहे. यानंतर सोशल मीडिया आणि समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विनेश ( Vinesh Phogat ) विरोधात हा सर्वात मोठा कट आहे असा आरोप तिचे सासरे राजपाल राठी यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे (Vinesh Phogat) वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

vijender singh on vinesh phogat disqualified
Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
UWW president Nenad Lalovic Statement on Vinesh Phogat Case
Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?
Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics Gold Medal Match in Olympic Games 2024
Vinesh Phogat : “वजन कमी केलं तरी तोंडावर कंट्रोल…”, अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटबाबत हिंदकेसरी दीनानाथ सिंग काय म्हणाले?
Vinesh Phogat News
Vinesh Phogat : विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा! पोस्ट करत म्हणाली, “मी हरले आणि…”
What Saina Nehwal say about vinesh phogat
Vinesh Phogat Disqualified: “विनेश फोगटकडून काहीतरी चूक…”, बॅडमिंटनपटू, भाजपा नेत्या सायना नेहवालचं मोठं वक्तव्य
Vinesh Phogat net worth
Vinesh Phogat : रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे माहितेय का? जाणून घ्या
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी

हे पण वाचा- Vinesh Phogat Disqualified: ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंसाठी वजनाचे नियम काय असतात? वजन कसे ठरवले जाते?

राजपाल राठी यांनी काय म्हटलं आहे?

“विनेशच्या ( Vinesh Phogat ) विरोधात ब्रिजभूषण सिंह यांनी सर्वात मोठा कट रचला आहे. डोक्यावर असलेल्या केसांमुळेही १०० ग्रॅम वजन वाढू शकतं. मात्र तिच्या विरोधात हा कट रचण्यात आला आहे. विनेशचं अपात्र ठरणं ही बातमी मनाला वेदना देणारी आहे. तिच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आलं. सपोर्ट स्टाफने तिला ( Vinesh Phogat ) कुठलीही मदत केली नाही. डोक्यावरच्या केसांमुळेही १०० ग्रॅमपर्यंत वजन वाढतं.” असं राजपाल राठी यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूजशी त्यांनी जो संवाद साधला त्यात त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप केला आहे.

vinesh fogat
कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरल्याने संपूर्ण देश हळहळला आहे.

विनेशविरोधात कट रचला गेला आहे

राजपाल राठी पुढे म्हणाले, ” मी अद्याप विनेशशी ( Vinesh Phogat ) बोललो नाही. मात्र तिच्या विरोधात कट रचला जातो आहे हे तिने मला सांगितलं. विनेश फोगटने ( Vinesh Phogat ) जयपूर आणि इतर ठिकाणीही हे वक्तव्य केलं. विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने लोक संतापले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांनी विनेशच्या विरोधात सर्वात मोठा कट रचला आहे. ज्याची भीती होती ती गोष्ट घडली. मंगळवारी जी मॅच झाली त्यावेळी वजन का वाढलं नाही? ” असा प्रश्नही राजपाल राठी यांनी विचारला आहे.