तिसऱ्या कसोटीत भरताने इंग्लंडवर दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. सामन्यात ४०० कसोटी बळींचा टप्पा पूर्ण करणाऱ्या रविचंद्रन अश्विन याला विराटने एक नवीन नाव देत स्तुती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“इंग्लंडने जे केलं तसं ‘टीम इंडिया’ने कधीच केलं नसतं…”

सामना संपल्यानंतर अश्विनच्या कामगिरीबद्दल बोलताना विराट म्हणाला, “अश्विनने ४०० कसोटी बळी घेणं हा खूपच मोठा पराक्रम आहे. प्रत्येक भारतीयाला अश्विनच्या या कामगिरीचा अभिमान असायला हवा. आपण यापुढेही अश्विनच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं हवं. मी अश्विनला म्हटलं होतं की ४०० बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर मी तुला ‘लेज’ (Ledge) या नावाने हाक मारेन. (Ledge हे लिजंड (Legend) चे संक्षिप्त रूप आहे. Legend म्हणजे महान खेळाडू.) अश्विन हा खरंच सध्याच्या क्रिकेट विश्वातील महान खेळाडू आहे.”

Video: “ए बापू, थारी बॉलिंग…”; विराटचं गुजराती ऐकून हार्दिक, अक्षर हसून लोटपोट

“कसोटी क्रिकेट म्हणजे काय ते आज सगळ्यांना नव्याने समजलं. संघात असूनही बुमराहला भरपूर विश्रांती मिळाली. १००वा सामना खेळत असूनही इशांतला अवघी काही षटकं टाकायला मिळाली.वॉशिंग्टन सुंदरबद्दल तर विचारूच नका. त्या बिचाऱ्याला केवळ तीन-चार चेंडू टाकायला मिळाले आणि फलंदाजीही फारशी मिळाली नाही. संपूर्ण खेळ अक्षर आणि अश्विन यांच्याभोवती फिरत होता. जाडेजा संघात नाही म्हटल्यावर इंग्लंडचा संघ काहीसा गाफिल राहिला आणि अक्षरने त्यांना बरोबर गुंडाळलं. जाडेजा असो वा अक्षर.. गुजराती डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघ का घाबरून असतात हे आता हळूहळू कळायला लागलंय”, असं मजेशीर वक्तव्य विराटने केलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli gives new name ledge to ashwin calls him modern day legend ind vs eng 3rd test vjb
First published on: 26-02-2021 at 13:57 IST