नवी दिल्ली : विराट कोहली ट्वेन्टी-२० संघापाठोपाठ भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडण्याचा विचार करू शकेल, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ‘‘कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ मागील पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढणे शक्य नाही. त्याला मानसिक थकवा जाणवत असल्यास आणि फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यास तो स्वत:हून भविष्यात कर्णधारपद सोडू शकेल. मात्र, हे नजीकच्या काळात होण्याची शक्यता कमी आहे. तसेच कसोटी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करता यावे यासाठी तो एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकेल,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.