VVS Laxman Team India Coach for Asian Games 2023: दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील, तर भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू हृषिकेश कानिटकर हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक असतील. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बंगळुरूजवळील अलूर येथे आशिया चषकापूर्वी टीम इंडियाच्या शिबिरावर देखरेख करत आहे. लक्ष्मण व्यतिरिक्त, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारताचे माजी लेग-स्पिनर साईराज बहुतुले गोलंदाजी प्रशिक्षक आणि मुनीष बाली क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.

Indian Women Badminton Team gets off to a winning start sport news
भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

द्रविडच्या अनुपस्थितीत अगोदरही सांभाळली आहे जबाबदारी –

आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका आणि विश्वचषक खेळायचा आहे. अशा स्थितीत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली युवा संघ हँगझोऊला जाणार आहे. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, आयर्लंड दौऱ्यावर ते संघासोबत गेले नव्हते.

हेही वाचा – The Hundred: सदर्न ब्रेव्हजविरुद्ध जोस बटलरने केला कहर! वादळी खेळीच्या जोरावर मँचेस्टर ओरिजिनल्सला पोहोचवले अंतिम फेरीत

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक स्टाफ –

भारतीय महिला संघासाठी, नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती डिसेंबरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगाम सुरू होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. २ कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळलेल्या कानिटकर, फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाच्या प्रभारी होते. कानिटकर व्यतिरिक्त, राजीव दत्ता (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि सुभदीप घोष (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे महिला संघाच्या सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य असतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ:

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

हेही वाचा – Kissing Controversy: जेनी हर्मोसोला किस करणे लुईस रुबियल्सला पडले महागात, फिफाने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण?

राखीव खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेडी.

राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पूजा वस्त्राकर.