Jos Buttler’s Storm Against Southern Braves Match: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीग पुरुष क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. शनिवारी ओव्हल येथे मँचेस्टर ओरिजिनल्स आणि सदर्न ब्रेव्ह यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात एलिमिनेटर सामन्यात बटलरने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मँचेस्टर ओरिजिनल्सच्या कर्णधाराने ४६ चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.

जोस बटलरच्या मॅच-विनिंग इनिंगच्या जोरावर मँचेस्टर ओरिजिनल्सने लीगच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्यचा यशस्वी पाठलाग केला. बाद फेरीत मँचेस्टर ओरिजिनल्ससमोर साउदर्न ब्रेव्हजने विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य जोस बटलरच्या संघाने ९६ चेंडूत ३ गडी गमावून पूर्ण केले.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Big blow for Lucknow Supergiants
IPL 2024 : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून झाला बाहेर

प्रथम फलंदाजी करताना सदर्न ब्रेव्हज संघाने १०० चेंडूत १ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १२२ धावांची शानदार भागीदारी केली. ऍलनने ३८ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेने ३८ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या. त्यानंतर सदर्न ब्रेव्हजचा कर्णधार जेम्स विन्सने अवघ्या २५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या.

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा मोठा निर्णय! आशिया कपसाठीच्या मुख्य संघात केला ‘हा’ बदल

जोस बटलरने केला कहर –

१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर यांनी मँचेस्टर ओरिजिनल्ससाठी ३२ चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. सॉल्टने १७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. यानंतर बटलरने ४६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची तुफानी खेळी करत संघाला अंतिम फेरीत नेले.

हेही वाचा – Kissing Controversy: जेनी हर्मोसोला किस करणे लुईस रुबियल्सला पडले महागात, फिफाने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण?

अशा प्रकारे मँचेस्टर ओरिजिनल्सने त्यांच्या आठ पैकी सहा सामने जिंकून लीग टप्प्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. रविवारी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ओव्हल इनव्हिन्सिबल्स यांच्यात अंतिम सामना होणार आहे.