मुंबईच्या मैदानावर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांविरोधात टी २० स्पर्धा खेळत आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच संघांच्या माजी क्रिकेटपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व आहे. याच संघात इरफान पठाणदेखील आहे. सध्या पठाण एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CoronaVirus : करोनामुळे IPL पुढे ढकलणार का? BCCI चं सूचक उत्तर

इरफान पठाण याने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात इरफान पठाणचा मुलगा इमरान पठाण सचिन तेंडुलकरशी बॉक्सिंग करताना दिसतो आहे. सचिन आणि इमरान यांच्यात सुरू असलेली धमाल मस्ती इरफानने कॅमेऱ्यात कैद केली आहे.

भारतीय महिला संघाला पाकिस्तानी फॅनने केलं ट्रोल, मिळालं सडेतोड उत्तर

पाहा तो धमाल व्हिडीओ –

T20 World Cup : भारताच्या पराभवावर सेहवागने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तेंडुलकरच्या संघाने लाराच्या संघाचा केला पराभव

मुंबईच्या वानखेडे मैदानावर शनिवारी क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भूतकाळाचा अनुभव घेता आला. Road Safety World Series स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीजवर ७ गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकत भारताचा कर्णधार सचिन तेंडुलकरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

‘क्रिकेटच्या देवा’चा महिला संघाला मोलाचा सल्ला, म्हणाला…

विंडीजच्या संघाने सावध सुरुवात करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. मात्र झहीर खानने डॅरेन गंगाचा त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार ब्रायन लारा इरफान पठाणच्या गोलंदाजीवर समीर दिघेकरवी यष्टीचीत झाला. मात्र दुसऱ्या बाजूने शिवनारायण चंद्रपॉलने एक बाजू सांभाळून धरत विंडीज संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. त्याने ४१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. भारताकडून झहीर खान-मुनाफ पटेल आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी २-२ तर इरफान पठाणने एक बळी घेतला.

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सचिन तेंडुलकर-विरेंद्र सेहवागने आपल्या जुन्या शैलीत वानखेडे मैदानावर विंडीज गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. सुलेमान बेनने सचिनला ३६ धावांवर बाद केलं. दुसऱ्या बाजूने सेहवागने फटकेबाजी करत ५७ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ७४ धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch irfan pathan son boxing match with sachin tendulkar after road safety world series video vjb
First published on: 09-03-2020 at 13:23 IST