भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांतील लढतीची पर्वणी पुन्हा चाहत्यांना अनुभवाला मिळणार आहे. हे दोन संघ आज ( १० सप्टेंबर ) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत आमनेसामने येणार आहेत. काही वेळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ कोलंबोत भिडणार आहेत. तेव्हा, कोलंबोतील हवामान कसं असणार? पाऊस पडणार का? हे सर्व प्रश्न सर्वांना पडले आहेत.

कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. गटफेरीतील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. यानंतर आज पुन्हा दोन्ही संघ भिडणार आहेत.

हेही वाचा : राहुल की किशन? ‘सुपर फोर’ फेरीतील भारत-पाकिस्तान लढत आज; राखीव दिवसाचाही पर्याय

हवामान खात्याने आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी कोलंबोत पाऊस झाला नाही. शनिवारीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला.

तर, आज सायंकाळी ५ नंतर AccuWheather नं ८० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण, सध्यातरी सूर्यप्रकाश पडला असून, हवामान स्वच्छ आहे.

हेही वाचा : “मोहम्मद शमीला बाहेर ठेवणारा…”, हरभजनने पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेईंग ११निवडीवरून रोहितवर साधला निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजच्या सामन्यात पाऊस पडला, तर उद्या ( ११ सप्टेंबर, सोमवार ) राखीव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी खेळवला जाईल, असे एसीसीने स्पष्ट केलं आहे. सामना ज्या स्थितीत पावसामुळे थांबेल, तिथूनच पुढे सुरू होईल.