मारिओ बालोटेलीने पदार्पणाच्या सामन्यातच दोन गोल करत सीरी ए स्पर्धेत एसी मिलानला उडिनेझविरुद्ध २-१ने विजय मिळवून दिला. ज्युवेन्टसने गुणतालिकेत अव्वल स्थान राखले. कॅटानिआने चिइव्होवर २-१ने विजय मिळवला. इंटर मिलानचा सिएन्नाविरुद्ध ३-१ असा धक्कादायक पराभव झाल्याने गुणतालिकेत ते पिछाडीवर पडले आहेत.
मँचेस्टर सिटीकडून एसी मिलान संघात समाविष्ट झालेला मारिओ बालोटेलीने दणदणीत पदार्पण करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.  बालोटेलीने २५व्या मिनिटाला गोल करत एसी मिलानचे खाते उघडले.  उडिनेझतर्फे जिआमपिअरो पिंन्झीने ५५व्या मिनिटाला गोल करत बरोबरी करून दिली. मात्र सामना संपायला काही मिनिटे असताना पेनल्टी कॉर्नरच्या आधारे बालोटेलीने आणखी एक गोल केला आणि एसी मिलानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.