जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : सातव्या डावातील बरोबरीने कार्लसनची आघाडी कायम

सर्वोत्तम १४ डावांच्या लढतीत सात डावांअंती कार्लसनच्या खात्यात चार गुण असून नेपोम्निशीचे तीन गुण झाले आहेत

मॅग्नस कार्लसन

दुबई : मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोम्निशी यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीचा सातवा डाव बरोबरीत सुटला. त्यामुळे जगज्जेत्या कार्लसनने या लढतीतील आपली आघाडी कायम राखली आहे. 

सर्वोत्तम १४ डावांच्या लढतीत सात डावांअंती कार्लसनच्या खात्यात चार गुण असून नेपोम्निशीचे तीन गुण झाले आहेत. पहिले पाच डाव बरोबरीत सुटल्यानंतर या दोघांमधील सहावा डाव तब्बल सात आणि ४७ मिनिटे चालला होता. यात १३६ चालींअंती कार्लसनला विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे सातव्या डावात तो अधिकच आत्मविश्वासाने खेळताना दिसला. मात्र, पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या नेपोम्निशीने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा डाव केवळ ४१ चाली आणि अडीच तासांत बरोबरीत सुटला. ‘‘आज आम्ही दोघांनीही चुका केल्या नाहीत. हा फारच संतुलित डाव झाला,’’ असे सातव्या डावानंतर नेपोम्निशी म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World chess championship carlsen takes lead zws

ताज्या बातम्या