AB De Villiers on Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला वाटते की भारताचा नंबर वन टी२० फलंदाज सूर्यकुमार यादवला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याच यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी स्वतःच्या मानसिकतेत थोडा बदल करणे आवश्यक आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारला आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची २४.३३ची सरासरी खूपच खराब आहे आणि २४ डावांमध्ये त्याच्या नावावर फक्त दोन अर्धशतके आहेत.

सूर्यकुमार स्वतःच मानतो की, त्याचे हे आकडे खूपच वाईट आहेत. तो डिव्हिलियर्सच्या ३६० डिग्री मारण्याच्या शैलीनुसार फलंदाजी करतो. त्याचे कौतुक करताना डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनल ‘AB de Villiers 360’ वर सांगितले की, “मी सूर्यकुमारचा खूप मोठा चाहता आहे. तो मी जसा खेळायचो तसाच खेळतो. मात्र, वन डेत त्याला अद्याप अशी फलंदाजी करता आलेली नाही. त्याच्या मनात थोडासा एकदिवसीय बाबत भीती आहे, असे वाटते. त्याच्या मनातील वन डे क्रिकेट फॉरमॅटबद्दलची जी मानसिकता आहे, त्याच्यात परिवर्तन घडवून आणण्याची सध्या गरज आहे. त्यासाठी टीम इंडियातील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला खूप काम करावे लागणार आहे. सूर्यामध्ये वन देत चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्यानेच त्याला विश्वचषक २०२३साठी संघात निवडण्यात आले.”

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल

हेही वाचा: Shubman Gill: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी गिलने शाहीन-नसीमचे केले कौतुक; म्हणाला, “अशा गोलंदाजी आक्रमणाची…”

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “सूर्यकुमारला विश्वचषक संघात पाहणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. टीम इंडियाला सामना फिरवून देणारा खेळाडू मिळाला आहे. मला आशा आहे की या विश्वचषकात त्याला प्लेईंग ११मध्ये संधी मिळेल. भारतीय संघाचा समतोल लक्षात घेता तो कदाचित सुरुवातीच्या सामन्यात नसेल पण विश्वचषक ही एक खूप मोठी स्पर्धा असल्याने एकतरी गेममध्ये तो प्लेईंग ११मध्ये असू शकतो, बघू पुढे रोहित शर्मा काय निर्णय घेतो आहे ते.”

संजू सॅमसनला विश्वचषक संघात स्थान मिळू न शकल्याबद्दल डिव्हिलियर्सने सूचक विधान केले. तो म्हणाला, “मला त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. तो काय करण्यास सक्षम आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच्याकडे फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून सर्व प्रकारचे कौशल्य आहे. फक्त मी आधी सूर्याबद्दल सांगितले तेच, हे सर्व मनात घडते. प्रत्येक खेळाडूने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तो एकदिवसीय सामन्यातील खेळाचे नियोजन, विश्वचषक आणि दबावाशी जुळवून कसा घेतो, हा खूप मोठा विषय आहे.”

हेही वाचा: Arshdeep Singh: भारताच्या माजी प्रशिक्षकांनी BCCIनिवडकर्त्यांवर साधला निशाणा; म्हणाले, “आम्ही डावखुरा गोलंदाज अर्शदीपवर…”

तो पुढे म्हणाला, “भारतीय संघ खूप मजबूत दिसत आहे. टीम इंडियाच्या बाबतीत माझ्या मनात एकच चिंता आहे ती म्हणजे, स्वतःच्या भूमीवर खेळणे आणि विजेतेपद पटकावणे. याआधी त्यांनी भारतात खेळून जेतेपद पटकावले आहे पण, त्यांच्यावर खूप दबाव असेल. ते याला सामोरे जाऊ शकतात, मला त्यात काही अडचण दिसत नाही. आपण जे काही नियंत्रित करू शकता, ते सर्व करा आणि धैर्याने खेळा.” भारतीय संघ घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर खूप दडपण असेल. रोहित शर्मा अँड कंपनीसाठी डिव्हिलियर्सने मंत्र दिला आहे की, “निर्भयपणे खेळा आणि २०११च्या यशाची पुनरावृत्ती करा, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा!”