Premium

WPL 2024 Auction : डब्ल्यूपीएलच्या लिलावात ‘या’ पाच भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर होऊ शकतो पैशांचा पाऊस

WPL 2024 Auction Updates : महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी उद्या म्हणजेच ९ डिसेंबर रोजी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. येथे पाच फ्रँचायझी १६५ खेळाडूंमधून ३० खेळाडूंची निवड करतील.

Women's Premier League 2024 Auction Updates in marathi
डब्ल्यूपीएल २०२४ चा लिलाव (फोटो-डब्ल्यूपीएल एक्स)

WPL 2024 auction will focus on five Indian uncapped women players : यंदा महिला प्रीमियर लीगच्या लिलावात ३० खेळाडूंचे नशीब चमकेल. डब्ल्यूपीएल २०२४ साठी पाच फ्रँचायझींकडे एकूण ३० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी एकूण १६५ खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. त्यापैकी १०९ खेळाडू अनकॅप्ड आहेत म्हणजेच त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. या अनकॅप्ड खेळाडूंमध्ये पाच भारतीय खेळाडू आहेत, ज्या या लिलावात वर्चस्व गाजवू शकतात. या त्या पाच खेळाडू असतील ज्यांच्यासाठी पाचही फ्रँचायझी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तयार असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. वृंदा दिनेश –

२२ वर्षांची वृंदा ही टॉप ऑर्डर बॅट्समन आहे. अलीकडेच तिला भारत-अ संघात स्थान मिळाले होते. तिने ऑफ-सीझनमध्ये पाचही फ्रँचायझींसाठी ट्रायल दिली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, ती वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धेत तिसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती.

२. उमा छेत्री –

ही २१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या इमर्जिंग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिने महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला तिला पदार्पणाची संधी मिळाली नसली, तरी बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघात तिचा समावेश करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेली ती आसाममधील पहिली खेळाडू आहे.

हेही वाचा – MS Dhoni : “जर २० किलो वजन कमी केले, तर मी आयपीएलमध्ये…”, अफगाणिस्तानच्या खेळाडूचा माहीबद्दल मोठा खुलासा

३. काशवी गौतम

या २० वर्षीय गोलंदाजाने २०२० मध्ये तिचे नाव चर्चेत आणले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, तिने अंडर-१९ महिला एकदिवसीय स्पर्धेत हॅट्ट्रिकसह सर्व १० विकेट्स घेतल्या होत्या. वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीमध्ये तिने ७ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. अलीकडे तिने भारत-अ संघाकडून खेळतानाही चांगली कामगिरी केली आहे.

४. मन्नत कश्यप –

मन्नत ही डावखुरी फिरकीपटू आहे. यासोबतच मन्नत चांगली फलंदाजी देखील आहे. या वर्षी अंडर-१९ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचीही ती सदस्य होती. येथे तिने ६ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. यानंतर तिने भारतीय संघाला एसीसी इमर्जिंग फायनलमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात तिने २० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा – AUS vs PAK Test : ना षटकार, ना चौकार, तरी एका चेंडूवर दिल्या सात धावा, पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा VIDEO व्हायरल

५. गौतमी नाईक –

नागालँडमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कारकिर्दीची सुरुवात करणारी गौतमी आता बडोदा संघाकडून खेळते. यापूर्वी ती गोलंदाजी अष्टपैलू होती, पण आता तिचे नाव आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये सामील झाले आहे. नुकत्याच झालेल्या सीनियर महिला टी-२० ट्रॉफीमध्ये ती पाचवी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wpl 2024 auction will focus on five indian uncapped women players including brinda dinesh vbm

First published on: 08-12-2023 at 19:36 IST
Next Story
AUS vs PAK Test : ना षटकार, ना चौकार, तरी एका चेंडूवर दिल्या सात धावा, पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा VIDEO व्हायरल