Yashasvi Jaiswal Bat Broke In Pieces on Chris Woakes Delivery: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये स्टोक्सने नाणेफेक जिंकली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजीसाठी उतरले. पहिल्या दिवशी दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. पण यदरम्यान यशस्वी जैस्वालबरोबर अनोखा प्रसंग घडला, त्याची बॅट अचानक तुटली.

यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले. दुसऱ्या कसोटी सामन्यातही अवघ्या काही धावांमुळे त्याचं शतक हुकलं. या सामन्यात यशस्वी मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय संघाने पहिल्या दिवशी चांगली सुरूवात करत राहुल यशस्वीने अर्धशतकी भागीदीरी रचली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर संयमी आणि काही प्रसंगी कमालीचे आक्रमक फटके खेळत धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालची बॅट नेमकी कशी तुटली, पाहूया.

यशस्वी सावधपणे फलंदाजी करत होता. लॉर्ड्स कसोटीत स्वस्तात बाद झाल्यानंतर या सामन्यात तो सांभाळून फलंदाजी करत आहे. इंग्लंडचे गोलंदाज वारंवार ऑफ स्टंपच्या लाईनवर गोलंदाजी करून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जैस्वालने मात्र आतापर्यंत संयमाने फलंदाजी केली आहे.

वोक्सने एक शॉर्ट बॉल टाकला जो यशस्वीने बॅकफूटवर जाऊन खेळायचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागात लागला आणि त्याच्या बॅटचं हँडल तुटलं. सर्वचजण हे पाहून अवाक् झाले. मग त्याने ड्रेसिंग रूममधून दुसरी बॅट मागवली आणि पुन्हा फलंदाजी सुरू केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल केले आहेत. दुखापतींनी घेरलेल्या भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये करुण नायर, नितीश रेड्डी आणि आकाशदीप यांच्या जागी साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि नवोदित अंशुल कंबोज यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडनेही एक बदल केला असून, लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या शोएब बशीरच्या जागी फिरकी गोलंदाज लियाम डॉसनला संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे.