रणजी करंडक २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश विरुद्ध बंगाल असे उपांत्य सामने बंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ अंतिम सामना खेळतील. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने कमाल केली आहे. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली आहे. रणजी करंडकातील हे त्याचे सलग तिसरे शतक आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा सलामीवीर ठरला आहे.

बंगळुरू येथील जस्ट क्रिकेट अकादमीत खेळल्या जात असलेल्या उपांत्य सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वीने उत्तर प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावून ‘रेकॉर्ड बुक’मध्ये आपले नाव नोंदवले. यशस्वीने २४० चेंडूत शतक पूर्ण केले. रणजी करंडकातील दोन्ही डावात शतक झळकावणारा तो मुंबईचा नववा फलंदाज ठरला.

रणजी करंडकाच्या या हंगामातील यशस्वी जयस्वालचे हे सलग तिसरे शतक आहे. त्यामुळे रणजी करंडकामध्ये सलग तीन शतके ठोकणारा तो मुंबईचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी गुलाम पारकर यांनी मुंबईसाठी अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरही मुंबईसाठी असा पराक्रम करू शकलेले नाहीत.

हेही वाचा – विश्लेषण : सौदी अरेबियातील पैशांसमोर नावाजलेल्या गोल्फ स्पर्धांची प्रतिष्ठा पणाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयस्वालने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात १५० चेंडूत १०३ धावा केल्या होत्या. आपल्या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी त्याने हातभार लावला होता. रणजीच्या या हंगामात यशस्वीने दोन सामन्यांतील चार डावात ३९० धावा केल्या आहेत.