राजेंद्र श्रीकृष्ण भट

घरात लावता येणारी आणि सौंदर्यात भर घालणारी झाडे कोणती हे आपण मागील भागात जाणून घेतले. या भागात घरात ठेवण्यायोग्य, हवा शुद्ध करणाऱ्या आणि कमी पाणी दिले आणि फारशी निगा राखली नाही तरी सहज तग धरणाऱ्या झाडांची माहिती घेऊ.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
summer
सुसह्य उन्हाळा!

हवा शुद्ध करणारी झाडे

उन्हात वाढणारी- अरेका पाम, स्टार फायकस, रबराचे झाड, ड्रेसेना व्हिक्टोरिया.

परावर्तीत प्रकाशात वाढणारी- पिस लिली, नागवेल, मिरी, जेड.कमी पाण्यात वाढणारी झाडे

उन्हात वाढणारी – अ‍ॅडेनियम, विविध रंगांचे आणि प्रकारचे निवडुंग.

परावर्तीत प्रकाशात वाढणारी – ब्रोमेलियाड्स, ऑर्किड, विविध झाडांचे बोन्साय.

यातील बहुतेक सर्वच झाडांना कीड व रोग यांचा फार कमी प्रमाणात त्रास होतो. कुंडय़ांतील माती पाण्याचा सहज निचरा होईल, अशीच असावी. झाडांवर अधूनमधून ताक व गुळाचे मिश्रण फवारावे. कुंडय़ांखाली एखादे छोटे थाळीसारखे भांडे ठेवावे. त्यामुळे कुंडीतून बाहेर पडणारे पाणी लादीवर सांडून घर अस्वच्छ होणार नाही. कुंडीखालच्या थाळीत साचलेले पाणी रोजच्या रोज रिते करावे. अन्यथा त्यात कीटकांची उत्पत्ती होण्याची भीती असते.