शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘डाऊनवॉर्ड फेसिंग डॉग’ हा व्यायाम महत्त्वाचा आहे. योगासनांमधील अधोमुख श्वानासन  हे जे आसन आहे, ते या व्यायाम प्रकारातीलच आहे. हा व्यायाम करताना श्वानासारखा आकार होतो म्हणून यास अधोमुख श्वानासन असे म्हटले जाते. पोटाची चरबी कमी करणे, पोटाचे स्नायू मजबूत करणे, रक्ताभिसरण सुधारणे आदी फायदे या व्यायामामुळे होतात.

कसे कराल?

  • सरळ उभे राहा आणि त्यानंतर दोन्ही हात पुढे करून खाली वाका. हे करताना पावले एकमेकांना चिकटवा. खाली वाकताना पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवा. कंबरही वर न करता खाली असली पाहिजे. दोन्ही हात खांद्याबरोबर नाही तर थोडे पुढे घ्या. श्वास सोडून कंबर वर उचला, ज्यामुळे शरीराला उलटा व्ही (^) आकार येईल. असे करताना पावले जमिनीपासून जरा वर उचला. पाय गुडघ्यातून न वाकता सरळ ठेवा. डोके आणि पाठ सरळ रेषेत पाहिजेत.