‘अ‍ॅस्ट्रम’चे स्मार्टवॉच

नवनवीन उत्पादने सादर करणाऱ्या ‘अ‍ॅस्ट्रम’ या कंपनीने ‘स्मार्टवॉच एसडब्ल्यू ३००’च्या माध्यमातून स्मार्ट घडय़ाळांच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. रुंद वर्तुळाकार डिझाइन, १.३ इंच आकाराची वर्तुळाकार स्क्रीन, सेंडेटरी रिमाइंडर, रक्तदाब, हृदयगती मोजणारी व्यवस्था, ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी, स्लीप ट्रॅकिंग अशी या वॉचची वैशिष्टय़े आहे. यामध्ये ‘सिरी’ व्हॉइस असिस्टंट पुरवण्यात आले असल्याने तुम्ही केवळ आवाजी सूचनेद्वारे स्मार्टवॉच नियंत्रित करू शकता. हे स्मार्टवॉच पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. ब्लुटुथने स्मार्टफोनशी कनेक्ट करून मोबाइल कॉल करणे वा स्वीकारणे किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावरील संदेशांचे नोटिफिकेशन तपासणे, या सुविधाही हे स्मार्टवॉच देते.

* किंमत : ३,३९० रुपये.

‘रिअलमी’चा ‘२-प्रो’

अल्पावधीतच भारतीय वापरकर्त्यांना आकर्षित करणाऱ्या ‘रिअलमी’ या स्मार्टफोन ब्रँडने ‘रिअलमी २ प्रो’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. स्नॅपड्रॅगन ६६० एआयई प्रोसेसर, ३५०० एमएएच क्षमतेची बॅटरी, मागील बाजूस १६ मेगापिक्सेल डय़ुअल कॅमेरा, पुढील बाजूस १६ मेगापिक्सेल कॅमेरा, ६.३ इंचाची स्क्रीन अशी या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहे. हा स्मार्टफोन तीन प्रकारांत उपलब्ध आहे. त्यामध्ये ४, ६ आणि ८ जीबी रॅम असलेल्या या तीन प्रकारांत स्टोअरेजची क्षमता अनुक्रमे ६४, ६४ आणि १२८ जीबी इतकी आहे. हा फोन ब्लु ओशन, ब्लॅक सी आणि आइस लेक अशा तीन रंगांत उपलब्ध आहे.

* किंमत : १३,९९० ते १७,९९० रुपये.

‘टेक्नो’चे दर्जेदार कॅमेऱ्याचे फोन

‘टेक्नो’ या कंपनीने दर्जेदार कॅमेऱ्यानिशी बनवण्यात आलेले तीन नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत. कॅमन आय एअर २, कॅमन आय २ आणि कॅमन आय २ एक्स अशी या फोनची नावे आहेत. या तिन्ही फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा पुरवण्यात आला असून त्यात ऑटो सीन डिटेक्शन, बोकेह मोड अशी वैशिष्टय़े आहेत. याखेरीज ६.२ इंचची एचडी प्लस स्क्रीन, ३७५० एमएएच क्षमतेची बॅटरी, फिंगरप्रिंट स्कॅनर अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत.

* किंमत : ८,९९९ ते १२,४९९ रुपये.