शेफ नीलेश लिमये

साहित्य

* १ वाटी उकडलेला राजमा, १ वाटी किन्वा, ८-१० चेरी टोमॅटो, पार्सली.

* ड्रेसिंगसाठी – २ चमचे रेड वाइन, व्हिनेगार, ४ चमचे ऑलिव्ह ऑइल, मीठ, २ हिरव्या मिरीचे दाणे.

कृती :

किन्वा आधी थंड पाण्यातून चांगला धुऊन घ्या. नंतर १०-१२ मिनिटे उकळत्या पाण्यातून शिजवा. आता हा शिजलेला किन्वा आणि उकडलेला राजमा एकत्र करून घ्या. ड्रेसिंगसाठी चेरी टोमॅटो, व्हिनेगार, पार्सली, ऑलिव्ह ऑइल, हिरवी मिरी एकत्र ठेचून घ्या. त्यात मीठ घाला. राजमा आणि किन्वाच्या मिश्रणावर हे ड्रेसिंग घालून ढवळून घ्या.

nilesh@chefneel.com