15 November 2019

News Flash

बाजारातनवे काय? : मर्सिडीज-बेन्झची नवी ई-क्लास

एडबल्यूबी बीएस ६ ई क्लास आता ई २०० आणि ई २२० डी या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

मर्सिडीज-बेन्झ या भारतातील आघाडीच्या लक्झरी कार उत्पादकाने नुकतीच बीएस ६ मोठा व्हीलबेस असणारी इ-क्लास बिजनेस सेदान ही गाडी दाखल केली आहे.

एडबल्यूबी बीएस ६ ई क्लास आता ई २०० आणि ई २२० डी या दोन प्रकारांत उपलब्ध आहे.  दहावी आवृत्ती असणारी नव्या इ-क्लासमधून  उत्तम, आरामदायी आणि आलिशान ड्रायव्हिंगचा अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या श्रेणतील गाडय़ांमध्ये सर्वात ऐसपैस रिअर केबिन ई क्लासचे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नव्या मोठय़ा व्हीलबेसच्या ई क्लासमध्ये दोन अद्ययावत बीएई ६ कम्प्लायंट पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहे. त्यात कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्यासाठी बदल करण्यात इंजिनच्या आतील भागात आले आहे. यामध्ये रिअर टचपॅड, बर्मेस्टर ही दमदार संगीत प्रणाली,  १२.३ इंचांच्या वाइडस्र्कीन डिजिटल कॉकपिटचा आणि रिअर वायरलेस चार्जरचा समावेश आहे.

आत्तापर्यंत केवळ टॉपएण्ड मॉडेलमध्येच उपलब्ध करण्यात आलेल्या अनेक सुविधा आता ई-क्लासच्या सर्व प्रकारांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. गाडीच्या सीटवर विशेष पॅटर्न देण्यात आला असून अप्पर डॅशबोर्ड आणि फ्लोअर कार्पेटचीदेखील विशेष रंगसंगतीचा समावेश करण्यात आला आहे. इन्स्ट्रमेन्ट डिप्स्लेसाठी १२.९ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी उच्च प्रतीची कामगिरी करणाऱ्या संगीत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेत १३ स्पीकरचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मागील बाजूला मोबाइलसाठी वायरलेस चार्जर देण्यात आले आहे. मागच्या आसनांमधील स्टोरेज कमापार्टमेन्टमध्येही चार्जिगसाठी सुविधा देण्यात आली आहे. रिअरटचस्क्रीनचा मीडिया, वातानुकूलन यंत्रणा, आणि गाडीतील इतर सुविधा वापरण्यासाठी केला जाऊ  शकतो. यामुळे मागे बसणाऱ्या प्रवाशांनादेखील गाडीतील सोयी नियंत्रित करता येतात. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने ईएसपी कव्‍‌र्ह डायनॅमिक असिस्ट, एलइडी हेडलॅम्प, प्री-सेफ, पार्किंग असिस्ट आणि गाडीच्या मागच्या बाजूला पार्किंग पायलटसह कॅमेरे देण्यात आले आहे. समोरच्या बाजूला दोन एअरबॅग्ज देण्यात आल्या असून फ्रंट साइड एअरबॅग, कर्टन एअरबॅग आणि चालकासाठी नी बॅग अशा एकूण सात एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. गाडी शून्य ते १०० किमी प्रति तास हे अंतर ८ सेकंदांमध्ये गाठत असून गाडीचा उच्चतम वेग २३६ किमी प्रति तास असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

किंमत

ई २०० एक्स्प्रेशन             ५७,५०,०००

ई २०० एक्स्लुजिव्ह           ६१,५०,०००

ई २०० डी एक्स्प्रेशन          ५८,५०,०००

ई २२० डी एक्स्लुजिव्ह        ६२,५०,०००

First Published on May 25, 2019 12:09 am

Web Title: article on mercedes benz new e class