तीळगूळ खाऊन तोंड गोडमिट्ट झाले असेल तर स्ट्रॉबेरीची ही नवी रसरशीत पाककृती करून पाहा.

साहित्य

३ स्ट्रॉबेरी, ३ लहान चमचे साखर, एक मोठा चमचा ताज्या लिंबांचा रस, सोडा आणि सजावटीसाठी पुदिन्याची पाने

कृती

मिक्सरचा ब्लेंडर बर्फाच्या तुकडय़ांनी भरून घ्यावा. त्यात साखर, स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण मिक्सरमधून तीन वेळा फिरवून घ्यावे. पण त्याचा अगदी लगदा करायचा नाही बरं का! प्रत्येक वेळी जेमतेम काही क्षणांसाठी ते फिरवावे मिक्सर थांबवावा परत करावे. असे करून झाल्यानंतर वरून पुदिन्याची पाने सजावटीसाठी घालावीत. सोबत स्ट्रॉबेरीच्या चकत्याही ठेवू शकता. तयार झाली तुमची स्ट्रॉबेरी डायकिरी.