शनिवार

रायगड जिल्ह्यतील रोहा हे तालुक्याचे ठिकाण. कोकण रेल्वेवरही हे स्थानक आहे. सकाळी रोह्यच्या उत्तरेला ६ कि.मी. वर असलेल्या अवचितगड या छोटेखानी किल्लय़ावर जावे. किल्लय़ावर पाण्याची ७ टाकी आणि त्याला असलेली कमान सुंदर आहे. किल्लय़ाचा बुरुज आणि त्यावरील शिलालेख अवश्य पाहावा. पुन्हा रोह्यला यावे. इथून ११ कि.मी. वर असलेल्या कोलाडला भेट द्यावी. इथे रमेश घोणे यांचे काष्ठशिल्प संग्रहालय आहे. सरपणात जमा झालेल्या लाकडांमध्ये जीव ओतून त्यातून जिवंत वाटणाऱ्या कलाकृती घोणे यांनी निर्माण केल्या आहेत. अशा लाकडांना ‘ड्रिफ्ट वुड’ असे म्हटले जाते. विविध आकार असलेल्या या लाकडामधील अतिशय आकर्षक अशी काष्ठशिल्पे घडवण्याचा श्री रमेशराव घोणे यांचा हा उद्योग मुद्दाम पाहायला हवा.

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

रविवार

रोह्यपासून २० कि.मी. वर असलेल्या तळा गावी जावे. इथे छोटेखानी किल्ला आहे. किल्ल्यावरून निसर्ग सुंदर दिसतो. तिथून पुढे ११ कि.मी. पश्चिमेला असलेली कुडा लेणी अवश्य पाहावीत. इ.स. पहिल्या शतकातील ही बौद्ध लेणी आणि तिथला परिसर सुंदर आहे. १५ लेण्यांचा हा समूह. स्तूप, पाण्याचे टाके, हत्तीचे शिल्प, गौतम बुद्धाची शिल्पे तसेच ब्राह्मी लिपीतील विविध शिलालेख आवर्जून पाहावेत असे. तिथून परत तळामार्गे इंदापूरला जावे. आकार पॉट आर्ट गॅलरी पाहावी. मातीपासून केलेल्या विविध वस्तू, सिंधूकालीन सील्स, तसेच मातीचे असंख्य प्रकार, माती भाजायची भट्टी या गोष्टी पाहता येतात. तसेच चाकावर मातीला आकारही देता येतो.

ashutosh.treks@gmail.com