डिसेंबर २०१९ च्या सुरवातीला चीनमध्ये नवीन कोरोना विषाणू या नवीन आजाराची सुरुवात झाली आणि आता या आजाराचे रुग्ण जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये आढळतात. या आजाराचे रुग्ण खोकल्याने अथवा शिंकल्याने त्यातून करोना विषाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

बाजारात वेगवेगळ्या आकाराचे वैद्यकीय मास्क उपलब्ध आहेत. सामन्यत: वापरला जाणारा मास्क हा कपडय़ाचा शिवलेला सपाट तीन ते चार घडय़ा घातलेला असतो. जो नाक आणि तोंड झाकतो आणि त्याला नाडी किंवा इलास्टिक असते जे डोक्याच्या पाठीमागे बांधले जाते. झडपेसह (किंवा विना झडप) शंकू किंवा बदकाच्या तोंडाच्या आकाराचे मास्कदेखील आहेत. जे नाक आणि तोंडासह चेहऱ्याचा बहुतांश भाग झाकतात. परंतु हे मास्क महाग आहेत.

कोणतीही लक्षणे नसणाऱ्या निरोगी व्यक्तीने वैद्य्कीय मास्क वापरू नये. कारण यामुळे सुरक्षिततेचे चुकीचे समज निर्माण होतात आणि त्यामुळे हात धुण्यासारख्या अन्य आवश्यक उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. समाजातील निरोगी व्यक्तीने मास्क वापरल्याने त्यांच्या आरोग्याला त्याचा कोणताही लाभ झाल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही. खरे तर मास्कचा चुकीचा वापर किंवा मास्कचा वापर  अधिक काळ किंवा वारंवार वापर केल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. यामुळे अनावश्यक खर्चदेखील होतो.

काय वापरावे?

  •  साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. हॅन्ड सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. जर हात घाण किंवा मळलेले असतील तर अल्कोहोल आधारित हॅन्ड सॅनिटायझरचा वापर न करता हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
  •  खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमालाने  झाका. जर रुमाल किंवा पेपर टिश्यू उपलब्ध नसेल तर खोकताना तोंडावर तुमच्या हाताचे कोपर ठेवा. वापर झाल्यानंतर टिश्यूची योग्य विलेव्हाट लावा आणि हात धुवा.
  •  चेहरा, तोंड, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. खोकणाऱ्या आणि शिंकणाऱ्या व्यक्तीपासून किमान एक मीटर लांब राहा.
  • आपल्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवा.

 

वैद्यकीय मास्क कधी आणि कुणी वापरावे?

  •  जेव्हा एखाद्य व्यक्तीला खोकला किंवा ताप येतो.
  •  आजारी असल्यास तीन लेयरच्या वैद्यकीय मास्कचा वापर केल्यास तुमचा संसर्ग इतरांना होण्यापासून आळा घातला जातो. असे असले तरीदेखील दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे हात वारंवार धुणे गरजेचे आहे.
  •  आरोग्य सेवा सुविधा केंद्रात जाताना
  •  आजारी माणसाची काळजी घेताना.
  •  संशयित/संसर्ग झालेल्या व्यक्तींची जेव्हा घरातच काळजी घेतली घेतली जाते, तेव्हा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी तीन लेयर मास्कचा वापर करावा.

वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावणे

वापरलेला मास्कची विल्हेवाट लावणे गरजचे आहे. रुग्ण/ काळजी घेणारे / घरगुती काळजी घेताना जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांनी वापरलेले मास्क सामान्य ब्लीच द्रावण (पाच टक्के) किंवा सोडियम हायपोक्लोराइट द्रावण (एक टक्के) वापरून र्निजतुकीकरण करावे आणि नंतर जाळून किंवा खड्डय़ात पुरून विल्हेवाट लावावी.

वैद्यकीय मास्कचा प्रभावी वापर कालवधी

योग्य पद्धतीने वापर केलेला वैद्यकीय मास्क आठ तासांपर्यंत प्रभावी असतो. जर या कालावधी दरम्यान तो ओला झाला तर तो तात्काळ दुसरा मास्क वापरावा.