News Flash

काकडी

काकडीचे तार काकडी, मावळी काकडी, तवसे, वाळूक असे काही प्रकार आहेत.

|| शहरशेती : राजेंद्र भट

काकडी ही सर्व ऋतूंत आणि कमी दिवसांत होणारी वेलभाजी आहे. काकडीचे अनेक प्रकार आहेत. या वेलाला आधारासाठी तणावे येतात. त्यांच्या मदतीने वेल वर जात राहतो. या पिकाचे आयुष्य ८०-९० दिवसांचे असते. तोडणी ४५व्या दिवशी सुरू होते.

सामान्यपणे प्रत्येक वेलाला १०-१२ काकडय़ा लागतात. कोवळ्या फळांमध्ये देठाच्या बाजूला मऊ, छोटे, देठांसारखे भाग असतात. त्यावरून फळाचा कोवळेपणा ओळखला जातो. वेलीवर आधी नर आणि नंतर मादी फुले येतात.

काकडीचे तार काकडी, मावळी काकडी, तवसे, वाळूक असे काही प्रकार आहेत. काकडीवर्गीय वेलभाज्यांना ककुंबर फॅमिली म्हणतात. या सर्वाचे रोग आणि कीड एकाच प्रकारची आहे.  काकडीत अमिनो अ‍ॅसिडचे अनेक प्रकार असतात. काकडी आणि शिराळी काही वेळा कडू निघतात. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काकडी खाऊन पाहावी आणि कडू असल्यास वेल उपटून टाकावा.

४-५ काकडय़ा बियांसाठी ठेवाव्यात. त्या झाडावरच पूर्ण जून होऊ द्याव्यात आणि नंतर काढाव्यात. कापून बियांचा भाग पाण्यात कुस्करावा. नंतर पाणी गाळून बिया वेगळ्या कराव्यात. उन्हात सुकवाव्यात. सुकलेल्या बिया काचेच्या बाटलीत भरून त्यावर चाळलेली राख भरून कागदाचे झाकण लावावे. पूर्ण हवाबंद करू नये. पूर्ण हवाबंद केल्यास त्यांच्या उगवण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 1:19 am

Web Title: city farming cucumber akp 94
Next Stories
1 होममेड हॉट चॉकलेट
2 फिरत्या चाकावरती नेशी..
3 सुवर्णकिमया