दिवाळीसाठी स्मार्ट रोषणाई

गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्स या कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाईचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ‘फोटॉन रोप लाइट’ हे सजावटीच्या वापरासाठी उपयुक्त असून एलईडी वापरामुळे यात जास्त ऊर्जा वापरली जात नाही. या विद्युत माळेमध्ये कनेक्टर पुरवण्यात आला असल्याने त्यासाठी स्वतंत्र ‘कन्व्हर्टर’ची गरज लागत नाही. १० ते १०० मीटर लांबीत ही माळ उपलब्ध आहे.

किंमत -१६,५६० रुपये. (१०० मीटरची माळ.)

टेफालची ‘स्टीम’ इस्त्री

‘टेफाल’ या कंपनीने मायस्ट्रो प्लस, इको मास्टर, स्टीम एसेन्शियल या ‘स्टीम’ इस्त्रीची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. दोन वर्षांची वॉरंटी असलेल्या या इस्त्रीमध्ये नॉनस्टिक सिरॅमिक सोल प्लेट आहे. त्यामुळे कापूस किंवा लिनियन कापड वापरूनही ती स्वच्छ करता येते. यामध्ये तापमान नियंत्रणाची व्यवस्था असल्याने इस्त्रीचे तापमान कमी होताच त्यातील छिद्रांतून पाण्याचे थेंब ओघळत नाहीत.

किंमत : १,४९९ ते २,९९९ रुपये.

सॅमसंगचा गॅलक्सी

‘ए २० एस’

सॅमसंग कंपनीने ‘गॅलक्सी ए २० एस’ नावाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या मोबाइलमध्ये जलद चार्जिग, ६.५ इंच आकाराचा एचडी डिस्प्ले, ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी, डॉल्बी साऊंड अशी वैशिष्टय़े आहेत. या मोबाइलच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा प्रमुख कॅमेरा असून त्याला आठ मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि पाच मेगापिक्सेलच्या पूरक कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. हा मोबाइल तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज तसेच चार जीबी रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे.

किंमत : ११,९९९ ते १३,९९९ रुपये.

टेलिफुंकेनचा स्मार्ट टीव्ही

जर्मनीतील ‘टेलिफुंकेन’ या ब्रॅण्डने भारतात ४९ इंची आणि ५५ इंची ४ के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही दाखल केला आहे. क्वांटम ल्युमिनीट टेक्नॉलॉजी एचडीआर १० तंत्रज्ञानाने युक्त या टीव्हीवर रंगसंगती उजळ आणि स्पष्ट दिसते. यामध्ये २० वॉटचे बॉक्स स्पीकर पुरवण्यात आले असल्याने बाह्य स्पीकरशिवायही तो चांगला ध्वनी पुरवतो.  या टीव्हीसोबत ‘स्ट्रिमवॉल’ ही सुविधा पुरवण्यात आली असून त्यात ७ हजार चित्रपट पाहण्याची सोय आहे. याखेरीज स्मार्ट टीव्हीवरील अन्य ओटीटी अ‍ॅप्सही त्यावर आधीच इन्स्टॉल करून देण्यात आले आहेत. एक जीबी रॅम आणि आठ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशी या टीव्हीची क्षमता आहे.

किंमत : २६,९९९ ते २९,९९९ रुपये.

नोकियाचा ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा

नोकिया फोनचे माहेरघर असलेल्या एचएमडी ग्लोबलने ट्रिपल कॅमेरा आणि प्यूरडिस्प्ले एकत्रित असणारा नोकिया ७.२ हा पहिला नोकिया स्मार्टफोन सादर केला आहे. नोकिया ७.२ मध्ये क्वाड पिक्सेल तंत्रज्ञान आणि झेडआयएसएस ऑप्टिक्ससह एक शक्तिशाली ४८ एमपी ट्रिपल कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रगन प्रोसेसर, दोन दिवस टिकणारी बॅटरी, अँड्रॉइड क्यू ऑपरेटिंग सिस्टिम, तीन वर्षांची वॉरंटी ही या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. हा मोबाइल ४ जीबी रॅम ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज तसेच ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज अशा दोन श्रेणींत उपलब्ध आहे.

किंमत : १८,५९९ ते १९,५९९ रुपये.