|| डॉ. अभिजीत जोशी

dr.abhijit@gmail.com

खांद्याच्या सांध्याची पुढील बाजू आणि छातीच्या स्नायूच्या बळकटीसाठी आज आपण व्यायाम करणार आहोत. हा व्यायाम करतानाही आपण थेराबँडचा वापर करणार आहोत.

कसे कराल?

१) थेराबँडचे एक टोक दरवाजाच्या हँडलला बांधा आणि त्याला थोडा ताण देऊन दुसरे टोक एका हातात धरा. हात कोपरापासून काटकोनात वाकलेला असावा.  (छायाचित्र १ पाहा)

२) त्यानंतर थेराबँडला आणखी ताण देऊन हात सरळ करा. (छायाचित्र २ पाहा) त्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत या. व्यायाम करताना खांद्याच्या पुढील बाजूस आणि छातीला थोडा ताण द्या. असे १० ते १५ वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवू शकता.