18 November 2019

News Flash

बाजारात नवे काय? : सुविधासंपन्न

नव्याने आणलेली व्ही ग्रेड डिझेलमध्ये उपलब्ध असून ती एस आणि व्ही एक्स ग्रेडच्या मधल्या श्रेणीत आहे

(संग्रहित छायाचित्र)

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्या प्रीमियम कार उत्पादक कंपनीने होंडा डब्ल्यू आर – व्ही पूर्णपणे नवीन डिझेल व्ही श्रेणी तसेच या विभागातील अग्रगण्य सुविधांसह अधिक सुधारित एस आणि व्ही एक्स श्रेणी बाजारात दाखल केली आहे.

होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या विक्री व विपणन विभागाचे संचालक तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल डब्ल्यू आर – व्हीच्या नवीन सुविधा तसेच सुधारणांबद्दल म्हणाले, ‘‘होंडा डब्ल्यू आर – व्ही ही २०१७ मध्ये बाजारात दाखल झाली होती. होंडा ब्रॅण्डची जागतिक स्तरावरील सर्व वैशिष्टय़े या गाडीत आहेत व ग्राहकांनीही या गाडीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. डब्ल्यू आर – व्हीसाठी नवीन व्ही ग्रेड तसेच एस आणि व्हीएक्स ग्रेडची अधिक सुविधासंपन्न पर्याय आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हफ-श् श्रेणीमध्ये आलेल्या या नवेपणाला ग्राहकांकडून पसंती मिळेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे.’’

नव्याने आणलेली व्ही ग्रेड डिझेलमध्ये उपलब्ध असून ती एस आणि व्ही एक्स ग्रेडच्या मधल्या श्रेणीत आहे. हेडलॅम्प इंटिग्रेटेड सिग्नेचर एलईडी डीआरएल आणि पोझिशन लॅम्प्स, फ्रण्ट फ्रॉग लॅम्प्स, ओआरव्हीएमवर टर्न इंडिकेटर्स, गन मेटल फिनिश असलेली आर१६ मल्टी-स्पोक अलॉय चाके, क्रोम डोअर हॅण्डल्स आणि रिअर मायक्रो अँटेना ही बाह्य रचनेतील सर्व वैशिष्टय़पूर्ण फीचर्स या गाडीमध्ये आहेत.

नवीन श्रेणीमध्ये काळ्या व चंदेरी या रंगसंगतीमध्ये आधुनिक अपहोल्स्ट्री असून, १७.७ सेंटिमीटरची आधुनिक  टचस्क्रीन इन्फोटेनमेंट यात एव्हीएनसह आहे. याशिवाय एचएफटीसाठी स्टीअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, ऑडिओ, व्हॉइस कमांड व क्रुझ कंट्रोल, स्वयंचलित हवामान नियंत्रक, पांढऱ्या व लाल इल्युमिनेशनसह वन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कीलेस रिमोटसह होंडा स्मार्ट की सिस्टीम, स्टोरेज कन्सोलसह फ्रण्ट सेंटर आर्मरेस्ट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक पॉवर स्टीअरिंग्स (ईपीएस) अशा अनेक सुविधा यात आहेत.

सुरक्षा

नवीन डब्ल्यू आर – व्ही ग्रेड होंडाच्या अनेक सक्रिय तसेच अप्रत्यक्ष सुरक्षितता तंत्रज्ञानांच्या विस्तृत श्रेणीने सुसज्ज आहे. अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्पॅटिबिलिटी इंजिनीअरिंग बॉडी  स्ट्रर,  डय़ुअल एसआरएस फ्रण्ड एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशनसह (ईबीडी) अँटि-लॉक ब्रेक सिस्टीम (एबीएस), रिअर पार्किंग सेन्सर, फ्रण्ट पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट, पेडेस्ट्रिअन इंज्युरी मिटिगेशन तंत्रज्ञान, इंटेलिजंट पेडल (ब्रेक ओव्हर राइड सिस्टीम) आणि गाइडलाइन्ससह मल्टि-अँगल रिअर व्ह्यू कॅमेरा या सुरक्षिततेच्या सुविधा सर्व गाडय़ांमध्ये दिलेल्या आहेत.

First Published on July 13, 2019 1:02 am

Web Title: feature rich new honda wrv abn 97
Just Now!
X