स्मार्ट टीव्हीकडे भारतीय ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन ‘आयसन’ या कंपनीने ‘A55UD970’ हा नवीन अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात आणला आहे. यामध्ये ए प्लस ग्रेड आयपीएस पॅनेल असून विस्तृत व्ह्यूइंग अँगलमुळे यावरील चित्र कोणत्याही कोनातून अतिशय सुस्पष्ट दिसते, असा कंपनीचा दावा आहे. यात २० वॉटचे स्पीकर बसवण्यात आले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी दोन यूएसबी पोर्ट, तीन एचडीएमआय पोर्ट आणि एव्ही इनपुटची सोय पुरवण्यात आली आहे. हे उत्पादन भारतातील विविध शहरांमधील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध झाले आहे.

  • किंमत : ५२९९० रुपये

अ‍ॅम्ब्रेनचे हेडफोन

‘पॉवर बँक’ निर्मितीत आघाडीवर असलेल्या ‘अ‍ॅम्ब्रेन इंडिया’ने ‘डब्लू एच-११’ या श्रेणीतील हेडफोन भारतात आणले आहेत. मऊ लेदर फिनिशिंग, इंटरअ‍ॅक्टिव्ह यूजर अनुभव आणि युनिव्हर्सल कॉम्पॅटिबिलिटी ही या हेडफोनची वैशिष्टय़े आहेत. या हेडफोनमध्ये बाहेरील आवाज कमी करणारे ‘डिजिटल अ‍ॅम्प्लिफायर’ आहेत. तसेच हेडफोन ९० मिनिटांत चार्ज होतात आणि त्यानंतर आठ तास सलग संगीत ऐकण्याचा आनंद घेता येतो. यासाठी या हेडफोनमध्ये ३०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. यातील ब्लूटुथ यंत्रणा दहा मीटरच्या अंतरावरूनही कनेक्ट केली जाते.

  • किंमत : २१९९ रुपये.

 ‘अ‍ॅस्ट्रमचे वायरलेस चार्जिग उपकरण

‘अ‍ॅस्ट्रम’ या भारतातील नावीन्यपूर्ण व सर्वोत्तम सोल्यूशन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या आयटी पेरिफेरल्स उत्पादक व आघाडीच्या ‘नवीन तंत्रज्ञान’ ब्रॅण्डने पहिले वायरलेस चाìजग उपकरण भारतात दाखल केले आहे. या चार्जरचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात वायर न जोडता तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता. अ‍ॅपल, सॅमसंग या कंपन्यांचे ‘क्यूआय’सक्षम फोन तुम्ही या उपकरणाने चार्ज करू शकता.

  • किंमत : ३४९९ रुपये.

झिऑक्सचा अ‍ॅस्ट्रा कव्‍‌र्ह प्रो

‘झिऑक्स’ या नव्या कंपनीने ‘अ‍ॅस्ट्रा कव्‍‌र्ह प्रो’ हा नवीन स्मार्टफोन भारतात आणला आहे. ५.५ इंचांचा एचडी डिस्प्ले, कव्‍‌र्हड थ्रीडी काच, २८०० एमएएच क्षमतेची बॅटरी, एक जीबी रॅम, अँड्रॉइड नगेट, १.३ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर अशी या फोनची वैशिष्टय़े आहेत. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा फ्रंट आणि मागील कॅमेरा आहे.

  • किंमत : ५४९९ रुपये.