|| अनिल पंतोजी 

नो ओव्हरटेकिंग

वाहन व रस्तेबांधणी यांच्यातील नवीन तंत्रज्ञानामध्ये अफाट प्रगती झालेली आहे. पर्यायाने प्रवासास लागणाऱ्या वेळेत बदत झालेला आहे. अरुंद रस्ते, पूल आणि वळणावर ओव्हरटेक करणे धोकादायक असते. सुरक्षिततेकरिता हे चिन्ह दर्शविले जाते.

नो हॉर्न

जास्त हॉर्नचा वापर केल्याने ध्वनी प्रदूषण होते व आरोग्यावरही परिणाम होतो. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय येथील परिसर शांतता क्षेत्र म्हणून ओळखले जातात. अशा क्षेत्रात हॉर्न वाजविणे निषिद्ध आहे.

गती सीमा

हे चिन्ह वाहनाची त्या रस्त्यावरील वेगमर्यादा निश्चित करते.  चालकांनी वेगमर्यादेपेक्षा जास्त वेग ठेवल्यास त्यांना दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागते.

नो पार्किंग

चालकांनी आपले वाहन अधिकृत वाहनतळामध्येच उभे केले पाहिजे. सदर चिन्हाच्या ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहन टोचण करून ओढून नेले जाते. आणि दंडदेखील वसूल केला जातो.