राजेंद्र श्री. भट rsbhat1957@gmail.com

घराच्या गॅलरीत आपण सुगंधी फुलांचे वेल लावून वातावरण सुगंधित करू शकतो, त्याचबरोबर बाहेरून येणारी धूळ, प्रदूषणसुद्धा काही प्रमाणात कमी करू शकतो. रंगीत सुगंधी फुलांचे वेल आणि पांढऱ्या सुगंधी फुलांचे वेल लावल्यास वेगळे वातावरणाचा आनंद मिळतो. कृष्णकमळात पाच प्रकारात  सायली, चमेली, जाई, जुई, मोगरा हे सुगंधीचा समावेश होतो. या वेलींसह  जॅकमेंशिया, संक्रांत वेल, किलोडेट्रॉन, रेक्सोना असे देखण्या फुलांचे वेलही लावता येतील.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

हे सर्व वेल महाराष्ट्रात सर्वत्र वाढू शकतात. हे वेल फार मोठे वाढत नाहीत. यांची लागवड जून फांद्या लावून करता येते. ज्यांच्याकडे असे वेल आहेत, त्यांना वेल फार वाढले तर छाटणी करावीच लागते.  साधारण पेन्सिलीच्या आकाराची फांदी द्यावी. फांदीचा काप नीट कापलेला असावा. पिचलेला किंवा चिरलेला असल्यास कटरने नीट कापून घ्यावा. कृषि केंद्रात मुळे फुटण्याची पावडर (कॅरेडेक्स) मिळते. ती कापलेल्या भागावर लावावी. फांदी मातीत (कुंडीत) लावण्याअगोदर फांदीवरील सर्व पाने काढून टाकावीत.  फांदी मातीत लावून हलके पाणी द्यावे.  शक्य झाल्यास फांदीच्या वरच्या टोकाला शेणाचा गोळा अथवा प्लास्टिकची पिशवी घट्ट बांधा. त्यामुळे फांदीतील ओलावा बाहेर जाण्याचे थांबेल. महिन्याभरात फांदीला फुटवे येतात. २-३ फुटवे ठेवून बाकीचे काढून टाकावेत. वेल ग्रिलवर चढविल्यावर साधारण फूट-दीड फूट वाढला की शेंडा कापावा. यामुळे पानाच्या बगलांमधून नवीन कोंब येऊन एका वेलाला अनेक फांद्या येतील व वेल ग्रिलवर सगळीकडे पसरेल.

कुंडीतील मातीमध्ये सेंद्रिय घटक व त्यावर वाढणारे सूक्ष्म जिवाणू व बुरश्या असतात. हे जिवाणू व बुरश्या सेंद्रिय घटकांमधील पोषक द्रव्ये मोकळी करतात व झाडाला पुरवतात. झाडाच्या वाढीसाठी मातीत जिवाणू व बुरश्या असण्याकरिता या कुंडीत आपल्या घरातील ओला कचरा, भाज्यांचे देठ, फळांची साले, आवारातील सुका पाचोळा, उसाच्या गुऱ्हाळातील चिपाड इ. घटक योग्य प्रमाणात टाकत राहिले तर झाडांना बाहेरून खत द्यावे लागत नाही. त्याचबरोबर छोटय़ाशा कुंडीत, कमी मातीतही आपण अनेक महिने चांगल्या प्रकारे झाडे वाढवू शकतो. झाडांचे अशा प्रकारे चांगले पोषण झाल्यास पूर्ण ग्रिलभर पसरणारा वेलही आपण वाढवू शकतो.

वेलींच्या प्रकारानुसार त्यांना कळ्या येऊन फुले सुरू होतात. बहुसंख्य वेलींचे वर्षांत ३-४ हंगाम असतात. फुलांचा हंगाम संपला की, हलकी छाटणी करावी. खत व पाणी द्यावे. हे लक्षात ठेवले पाहिजे की, कळ्या नवीन फुटीवरच येतात. म्हणून सातत्याने नवीन फूट कशी येईल हे पाहावे. अधूनमधून एक लिटर पाण्यात एक कप ताक किंवा कच्चे दूध मिसळून फवारणी करावी. दर १५ दिवसांनी लिटरभर पाण्यातून कपभर गोमूत्र फवारल्यास कीड व रोगनियंत्रण होते. गोमूत्रातील अमोनियामुळे वेलीची वाढसुद्धा चांगली होते. अशा प्रकारे वेलींनी आपले घर प्रसन्न व सुगंधित करणे शक्य होते.