लॅपटॉपनिर्मितीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘आसूस’ने व्हिवोबुक एस१५ आणि एस १४ हे दोन नवीन लॅपटॉप बाजारात आणले आहेत. विंडोज १० या ऑपरेटिंग सिटीमवर आधारित हे लॅपटॉप अतिशय पातळ आणि या मालिकेतील अन्य लॅपटॉपपेक्षा आकाराने लहान आहेत. १५.६ इंची आकार असलेल्या ‘एस१५’चे वजन फक्त १.८ किलो आहे तर, ‘एस१४’चे वजन १.४ किलो आहे. आठव्या पिढीच्या इंटेल कोअर आय७ प्रोसेसर, ‘एनव्हीडीया’ जीफोर्स एमएक्स १५० ग्राफिक्स, डय़ुअल स्टोअलेज डिझाइन, ४९ मिनिटांत ६० टक्क्यांपर्यंत चार्ज होणारी बॅटरी अशी या लॅपटॉपची वैशिष्टय़े आहेत. हे लॅपटॉप आयसिकल गोल्ड, फर्मनेंट ग्रीन, सिल्व्हर ब्लू, गन मेटल अशा पाच रंगांत उपलब्ध आहेत.

किंमत : ‘एस १५’ – ६९९९० रुपये. ‘एस१४’ – ५४९९० रुपये.

‘दायवा’चा ‘क्वांटम ल्युमिनन्ट स्मार्ट टीव्ही’

परवडणाऱ्या दरांत उच्च श्रेणीतील टीव्ही आणणाऱ्या ‘दायवा’ या कंपनीने ‘ऊ50दवऌऊ-ट10’ आणि ‘ऊ55दवऌऊ-ट10’ हे अनुक्रमे १२४ सेमी (४९ इंच) आणि १४० सेमी (५५ इंच) आकाराचे स्मार्ट टीव्ही बाजारात आणले आहेत. आकर्षक फिनिशिंग, एचडीआरएक्स तंत्रज्ञान, उच्च दर्जाचा कॉन्ट्रास्ट, सुस्पष्ट चित्र, बिल्ट इन साऊंड बार, अँड्राइड ७.० नोगट ऑपरेटिंग सिस्टीम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, यूटय़ूब हे अ‍ॅप अशी या टीव्हीची वैशिष्टय़े आहेत. यामध्ये एक जीबी रॅम असून आठ जीबीपर्यंत स्टोअरेज क्षमता आहे.

किंमत : ३२९९० ते ४२९९० रुपये.

‘नोबेल स्किडो’चा टीव्ही

‘वेरा ग्रूप’चा भाग असलेल्या ‘नोबेल स्किडो’ या कंपनीने अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही ‘एनबी५५सीयूएव्ही०१’ बाजारात आणला आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, अँटिग्लेअर पॅनल, एचडी दर्जाचे चित्र, आठ जीबी मेमरी, दोन यूएसबी पोर्ट, दोन एचडीएमआय पोर्ट, इनबिल्ट अ‍ॅप अशी या टीव्हीची वैशिष्टय़े आहेत.

किंमत : ६९९९९ रुपये.