News Flash

बाजारात नवीन काय?

झेडएस ईव्ही ही एमजीची पहिली विशुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे, ज्यात स्वच्छ, कार्यक्षम आणि जलद पॉवरट्रेन आहे.

एमजीच्या ‘झेडएस ईव्ही’चे अनावरण

एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडियाने गुरुवारी ‘झेडएस ईव्ही’ या आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक व्हेईकल इकोसिस्टमचे अनावरण केले आहे. ही देशातील पहिली विशुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

झेडएस ईव्ही ही एमजीची पहिली विशुद्ध इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे, ज्यात स्वच्छ, कार्यक्षम आणि जलद पॉवरट्रेन आहे. यात असलेली सीएटीएल या जगातील एका अत्यंत मोठय़ा उत्पादन कंपनीची नवीन प्रगत ४४.५ केडब्ल्यूएच, लिक्विड कूल्ड एनएमसी (निकल मँगेनीझ कोबाल्ट) बॅटरी कारला पूर्ण चार्जिग असल्यास ३४० किमी प्रवास करण्याची क्षमता देते. ते ३५३ एनएम इन्स्टंट टॉर्क आणि १४३ पीएस पॉवर देते व स्थिर अवस्थेतून केवळ ८.५ सेकंदात ताशी १०० किमी गती प्राप्त करून देते.

झेडएस ईव्ही ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मल्टी स्टेप चार्जिग इकोसिस्टमच्या उभारणीसाठी एमजी मोटर इंडियाने विविध जागतिक आणि स्थानिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. प्रत्येक झेडएस ईव्हीसोबत एक ऑन बोर्ड केबल असते, ज्याने कोठेही चार्जिग करता येऊ  शकते तर एसी फास्ट चार्जरद्वारे घरी, कचेरीत चार्जिग करता येते. ही कंपनी काही निवडक एमजी शोरूम्सवर एक डीसी सुपर-फास्ट चार्जिग नेटवर्कदेखील उभारते आहे आणि निवडक सॅटेलाइट शहरांत मुख्य मार्गावर एमजी डीलरशिप्समध्ये एक विस्तारित चार्जिग नेटवर्क तयार करण्याची त्यांची योजना आहे. सुपर-फास्ट डीसी चार्जर्स (५० केडब्ल्यू) मार्फत झेडएस ईव्ही ५० मिनिटांत ८०% बॅटरी क्षमता गाठते तर घरी बसवलेल्या एसी फास्ट चार्जर्सद्वारे पूर्ण चार्जिग करण्यासाठी ६ ते ८ तास लागू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:58 am

Web Title: new in market akp 94 2
टॅग : Market
Next Stories
1 अध्यात्म आणि कलेचा संगम
2 झँडर मासा
3 विना साखरेची बर्फी
Just Now!
X