बाजारात काय? : सुहास धुरी

उन्हाळा सुरू झाला की,  तहान भागविण्यासाठी सरबत, आइस्क्रीम, पेयजलाकडे पावले वळत असतात. उन्हाळ्यात घसा कोरडा पडून तहान लागत असल्याने ती भागविण्यासाठी पाणी, सरबत, आइस्क्रीम वा इतर पेयजलांचा अनेक जण आधार घेत असतात. ही पेयजले वेळीच उपलब्ध होतील असे सांगता येत नाही. त्यासाठी  सोबत कोठेही सहज नेता येईल आणि कधीही फळरसाचा आनंद घेता येईल, असे ज्यूसर बाजारात उपलब्ध झाले आहेत.

पाण्याच्या बाटलीप्रमाणे असलेले हे पोर्टेबल ज्यूसर  उन्हाळ्यात  अधिक जण हाताळताना दिसतात. ज्यूसर बॅटरीवर चालतात.  यूएसबीद्वारे हे उपकरण रिचार्जेबलही करता येते. त्यासाठी २००० एमएएच बॅटरी देण्यात येते.  सोबत चार्जरही देण्यात येतो. एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली, की ३५० ते ६०० एमएल इतका फळांचा रस या ज्यूसरमधून आपल्याला काढता येतो.    मिनिटाला एक ग्लास असे २० ते २५ ग्लास ग्लास फळांचा रस आपण काढू शकता.

कार्यालय, शाळा, शिबीर किंवा पर्यटनस्थळी, प्रवासात जरी बॅटरीची क्षमता संपली तरीही सोबत पोर्टेबल ट्रॅव्हल चार्जर किंवा पॉवर बँकमार्फत हा ज्यूसर चार्जिग करून पुन्हा कार्यरत करू शकता.  चार्ज होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. आपल्या मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरद्वारे ज्यूसर चार्जिग करणे शक्य आहे. चार्जिगसाठी दोन सॉकेट दिले आहेत. ज्यूसरद्वारे मोबाइलही चार्ज करता येतो. टरबूज, केळी, अननस, केशरी, सफरचंद, मोसंबी, संत्रे इत्यादी रसाळ फळांचा रस  काढता येते. मिल्क शेक, पाइनपल शेक, मँगो शेक, स्ट्रॉबरी शेक बनविण्याचा आनंदही  घेऊ शकता.  कोल्ड कॉफीही करू शकता. रस गाळून घेण्यासाठी  गाळणीदार झाकणच या उपकरणाला बसविण्यात आले आहे. त्यामुळे रस सहज गाळून घेता येतो. या उपकरणाला स्वच्छ करणेही फारच सोपे आहे. यामध्ये पाणी टाकले आणि पुन्हा बटण सुरू केले की हा ज्यूसर धुऊन स्वच्छ होतो. प्लास्टिकपासून जरी हे उपकरण बनविले गेले असले तरी हे प्लास्टिक तकलादू नाही. त्याचा दर्जा चांगला असल्याने जरी हातातून पडले तरी त्याला काहीही होत नाही. हे त्याचे वैशिष्टय़ समजावे लागेल. दोन ते चार ब्लेड असलेले ज्यूसर बाजारात आहेत. एखाद्या ज्यूसरचे झाकण काढले आणि चुकून जर त्याचे बटन दाबले गेले तर मोटार सुरू होऊन त्याद्वारे फिरत्या ब्लेडपासून इजाही पोहोचण्याचा धोका असतो. मात्र काहींमध्ये त्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये झाकण लावल्यावरच या ज्यूसरची मोटर सुरू करता येते. अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध कंपन्या बाजारात आहेत. ४०० रुपयांपासून याच्या किमती सुरू होत असून ऑनलाइन बाजारात याची मोठय़ा प्रमाणात विक्री-खरेदी होत असते.

वैशिष्टय़े

  • आकर्षक कलाकुसर, रंगसंगती, वजनाला हलके
  •  ३५० एमएल ते ६०० एसएल रसाची क्षमता
  •  चार्जर, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर पॉवर बँकद्वारे चार्जिग
  • १००० ते २००० एमएएच बॅटरी
  •  चार्ज झाल्यानंतर २० ते २५ ग्लास रस
  • फळांचा रस, मिल्क शेक, मँगो शेक आदी तयार करणे शक्य
  •  स्वच्छ करणे अगदी सोपे

suhas.dhuri@expressindia.com